Marathi Dessert Recipe for Father’s Day Celebration: दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचा हा दिवस. या दिवशी तुमच्या बाबांसाठी काहीतरी खास आणि गोड बनवायचं ठरवलं आहे का? तर मग बटरस्कॉच मूस ही गोडसर डेझर्ट रेसिपी तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरू शकते. घरच्या घरी अगदी सहज उपलब्ध साहित्य वापरून तुम्ही ही गोड डिश तयार करू शकता. चला तर मग पाहूया ही खास रेसिपी.
साहित्य½ कप ब्राउन शुगर
3 टेबलस्पून अनसाल्टेड बटर
½ कप हेवी क्रीम
½ टीस्पून मीठ
1 टीस्पून व्हॅनिला एसेंस
1 कप थंड हेवी क्रीम
1 टीस्पून जिलेटिन
1 टेबलस्पून थंड पाणी
एका पॅनमध्ये बटर आणि ब्राउन शुगर मध्यम आचेवर वितळवा.
२-३ मिनिटे ढवळत शुगर पूर्ण वितळेपर्यंत शिजवा.
नंतर त्यात हेवी क्रीम आणि मीठ घालून पुन्हा २-३ मिनिटे शिजवा.
गॅस बंद करून त्यात व्हॅनिला एसेंस घालून गार होऊ द्या.
जिलेटिन थंड पाण्यात ५ मिनिटे भिजवा आणि नंतर गरम करून वितळवा.
हे जिलेटिन तयार बटरस्कॉच सॉस मध्ये घालून नीट मिसळा.
थंड क्रीमला मिक्सरने फेटा जोपर्यंत हार्ड पीक्स तयार होतात.
तयार सॉस हळूहळू या फेटलेल्या क्रीममध्ये मिसळा, संथपणे ढवळा.
हे मिश्रण ग्लास किंवा बाउलमध्ये ओता आणि किमान २ तास फ्रीजमध्ये ठेवा.