सुवर्ण दर: सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात सतत वाढ होत होती. त्यामुळं ग्राहकांना मोठा फटका बसत होता. वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी करणं परवडत नव्हते. मात्र, दुसऱ्या बाजुला गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करताना दिसत आहेत. दरम्यान, आज कोणत्या शहरात सोन्याचे किती दर आहेत? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
गुंतवणूकदारांच्या मनात सोन्याबद्दल नेहमीच सकारात्मक भावना असते. भारतात आज म्हणजेच गुरुवारी 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 9840 रुपये दराने विकले जात आहे. दिवसाच्या सुरुवातीला 22 कॅरेट सोने 9.20 रुपये आणि 18 कॅरेट सोने 7380 रुपये दराने विकले जात आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज 18 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 7393 रुपये, तर 22 कॅरेट सोने 9.35 रुपये आणि 24 कॅरेट सोने 9855 रुपये दराने विकले जात आहे. जर आपण आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोललो तर, येथे 18 कॅरेट सोने 7380 रुपये, 22 कॅरेट सोने 9.20 रुपये आणि 24 कॅरेट सोने 9840 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे. बंगळुरुमध्ये 18 कॅरेट सोने 7380 रुपये, 22 कॅरेट सोने 9020 रुपये आणि 24 कॅरेट सोने 9840 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे. चेन्नईमध्ये 18 कॅरेट सोने 7415 रुपये, 22 कॅरेट सोने 9020 रुपये आणि 24 कॅरेट सोने 9840 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे. हैदराबादमध्ये 18 कॅरेट सोने 7380 रुपये, 22 कॅरेट सोने 9020 रुपये आणि 24 कॅरेट सोने 9840 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे. कोलकातामध्ये 18 कॅरेट सोने 7163 रुपयांना, 22 कॅरेट सोने 8755 रुपयांना आणि 24 कॅरेट सोने 9551 रुपयांना विकले जात आहे.
भारतात सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या सोन्याचे विशेष महत्त्व आहे. कोणत्याही लग्न किंवा उत्सवात सोन्याला खूप शुभ मानले जाते. याशिवाय, त्याचे दर विनिमय दर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील हालचाल, सीमाशुल्क आणि डॉलरच्या मूल्यातील दररोजच्या चढउतारांवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांचाही सोन्यावर परिणाम होतो. जर आंतरराष्ट्रीय बाजारात खूप हालचाल होत असेल, तर गुंतवणूकदार सोन्यात त्यांचे पैसे गुंतवणे अधिक सुरक्षित मानतात. याचे कारण म्हणजे त्यातील जोखीम घटक जवळजवळ नगण्य आहे. 22 एप्रिल रोजी सोन्याने एक लाखाचा विक्रम गाठला. त्यानंतर त्याच्या किमतीत घट झाली. परंतु पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा