एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा
Webdunia Marathi July 05, 2025 03:45 AM

Pune News: सध्या राज्यात मराठी हिंदी वाद सुरूच आहे. पुण्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात आले असून पुण्यात गुजराती समाजाकडून कोंढवा भागात सेंटर उभारण्यात आले आहे. जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनाच्या वेळी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण दिले. भाषण संपल्यावर शिंदे यांनी धन्यवाद, जय महाराष्ट्र म्हणून निघत असताना खाली वाचून जय गुजरात अशी घोषणा केली.

ALSO READ: पुणे बलात्कार प्रकरणावर अबू आझमी संतापले, म्हणाले- अशा लोकांना फाशी द्या

आता या वरून पुन्हा नवीन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या वेळी शिंदे यांनी अमित शाह यांच्या उपस्थित एक शेर ऐकवले. ते म्हणाले, आपके बुलंद इरादोसें तो चट्टानेभी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है, तुफानभी अपना रुख बदल लेता है. आपके आनेसे हर शख्स अदबसे झुक जाता है. यावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ALSO READ: धक्कादायक : पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना दौंडमध्ये लुटले तर अल्पवयीन मुलींवर बलात्कार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुणे येथील जैरम स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन केले. या दरम्यान त्याने मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही उपस्थित होते. तसेच पुणेचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते.

Edited By - Priya Dixit

ALSO READ: पुणे : एअरलाईनला बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला


© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.