आपण स्वत:च्या किंवा इतरांच्या घरात प्रवेश करताना चप्पल आणि बूट बाहेर काढतो. आपल्याला लहानपणापासूनच ती शिकवण दिली जाते. पण घरात चप्पल-बूट घालून जाण्यास मनाई का असते यामागचे कारण कोणीही आपल्याला सांगत नाही.
आज आपण घरात प्रवेश करताना चप्पल आणि बूट बाहेर का काढावे, याबद्दलचे नेमकं कारण जाणून घेणार आहोत. ‘टायो’ या चीनच्या धार्मिक पुस्तकावर आधारित फेंगशुई टिप्स देण्यात आल्या आहेत.
आपण बाहेरुन येताना आपल्या बुटांसोबत धूळ, माती आणि नकारात्मक ऊर्जा घेऊन येतो, असे फेंगशुई सांगते. जर आपण बाहेरचे बूट-चप्पल घरात घेऊन आलो, तर ती नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते.
चप्पल आणि बूट घरात काढल्याने तणाव वाढू शकतो. तसेच मानसिक अशांतता निर्माण होऊ शकते. त्यामुळे, घरात येण्यापूर्वीच बूट-चप्पल बाहेर काढणे आवश्यक आहे.
घरात बूट-चप्पल घालून फिरल्यास बाहेरचे जंतू घरात येतात. ज्यामुळे आजार पसरण्याचा धोका असतो. म्हणूनच घरात बाहेरचे बूट न आणण्याचा सल्ला दिला जातो.
घरातील वातावरण शांत आणि पवित्र असते. हे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवण्यासाठी, बाहेरची दूषित हवा आणि घाण घरात येऊ नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
फेंगशुई टिप्सनुसार घरासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वापरले जाणारे बूट-चप्पल कायम वेगळे ठेवावेत. बाहेरचे बूट-चप्पल घरात येण्यापूर्वी काढले पाहिजेत, तर घरातले बूट-चप्पल घराबाहेर कधीही नेऊ नयेत.
फेंगशुईसोबतच अनेक संस्कृतींमध्येही घरात प्रवेश करण्यापूर्वी बूट काढणे हे आदर आणि नम्रतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे आदर म्हणूनही घरात बूट काढण्यास मनाई केली जाते.