कोळवण, ता. १२ : खासदार सुप्रिया सुळे या शुक्रवारी (ता. १३) जून रोजी मुळशी तालुका दौऱ्यावर येत असून, त्या सकाळी साडेनऊ वाजता भालगुडी येथील वूई चेंज द फाउंडेशन आयोजित टीनएजमधील मुला-मुलींसाठीच्या कॅम्प समारोपास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी पाऊण वाजता चाले येथील पुलाच्या बांधकाम पाहणी आढावा घेणार आहेत. त्यानंतर पिरंगुट मधील फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी भेट देणार आहेत.