Maharashtra Politics : मोठी बातमी! गुजरात विमान अपघातामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू.. खासदार परिमल नाथवानी यांचं ट्विट..
Sarkarnama June 13, 2025 01:45 AM

अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. 242 प्रवासी या विमानात होते, त्या रुपानी हे ही होते. राज्यसभेचे खासदार परिमल नाथवानी यांनी रुपानी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारे ट्विट केले आहे.

Ahmadabad Plane Crash : विमानाच्या इंजिनला पक्षी धडकले आणि ते कोसळले..

एअर इंडियाचे विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन टेकऑफ केलं होतं. त्यानंतर 15 मिनिटात हे विमान मेघानी नगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आदळले. समोर आलेल्या माहितीनुसार टेकऑफ केल्यानंतर विमानाच्या दोन्ही इंजिनला पक्षी धडकले. त्यामुळे विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद झाले. पायलटला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे कळताच त्याने इमर्जन्सीचा सिग्नल दिला होता. पण दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद झाल्यामुळे विमान जाऊन आदळले.

PM Modi On Plane Crash: अहमदाबादमधील दुर्घटनेने आपल्याला दुःखी केले आहे..

अहमदाबादमधील दुर्घटनेने आपल्याला धक्का दिला आहे आणि दुःखी केले आहे. हे हृदयद्रावक आहे जे शब्दांत सांगता येत नाही. या दुःखद घटनेत, माझ्या संवेदना या घटनेने प्रभावित झालेल्या प्रत्येकासोबत आहेत. बाधितांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.

Plane Crash Updates : बीजेएम मेडिकल काॅलेजच्या हाॅस्टेलवर विमान कोसळले, वीस विद्यार्थ्यी दगावल्याची शक्यता..

अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे उडालेले विमान ज्या इमारतीवर कोसळले ते बीजेएम मेडिकल काॅलेजची असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी जेवत असताना दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी हे विमान इमारतीवर कोसळले. वीस विद्यार्थी या अपघातात दगावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पंधरा जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.

Plane Crash Updates : पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळ बंद राहणार

गुजरातहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया AI 171 हे विमान अहमदाबाद च्या सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात क्रॅश झाले . तब्बल 700 फुटांवरून हे विमान कोसळलं आहे . घटनास्थळी प्रचंड आग व धुराचे काळे लोट दिसत आहेत .अपघातानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाले आहेत .पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळ बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

BJP News : गुजरात विमान अपघातानंतर भाजपचे देशपातळीवरील सर्व कार्यक्रम रद्द..

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनसाठी उडालेले एअर इंडियाचे १७१ हे विमान क्रॅश झाले. नागरी वसाहतीतील एका इमारतीवर उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटात हे विमान कोसळले. २४२ प्रवाशी या विमानात होते. या अपघातानंतर भाजपने देश पातळीवर पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री व नागरी उड्डयण मंत्री राम मोहन नायडू अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.

Plane Crash Updates : अपघातग्रस्त विमानात ब्रिटीश, पोर्तुगीज आणि कॅनेडियन प्रवाशी..

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या अपघातग्रस्त विमानात विदेशी प्रवासी असल्याचीही माहिती समोर आली आहे. १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश , ७ पोर्तुगीज तर एक कॅनेडियन प्रवासी विमानात होते, अशी माहिती आहे.

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून एअर इंडियाचे विमान दुपारी एकच्या सुमारास लंडनकडे जाण्यासाठी उडाले. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर हे विमान एका नागरी वसहतीतील इमारतीवर कोसळले. या विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही नाव प्रवाशांच्या यादीत आहे. अपघात भीषण असल्याने यात किती प्रवासी दगावले याचा निश्चित आकडा समोर आलेला नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे अहमदाबादला रवाना झाले आहेत.

Plane Crash Updates : अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानीही..

अहमदाबाद विमान अपघात दुर्घटनेत गुजराजचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे ही प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. लंडनाला हे विमान निघाले होते. उड्डाण करताच हे नागरी वसतीवर कोसळले. या विमानात २४२ प्रवासी प्रवास करत होते. मुख्यमंत्री पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

Plane Crash Updates : अहमदाबाद विमान अपघातात सर्व प्रवासी दगावल्याची भिती

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये विमानाचे तुकडे तुकडे झाल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओनुसार अपघात झालेल्या विमानाचा एक पंख तुटून पडला आहे असे दिसत आहे.  अपघातग्रस्त विमान बोईंगचे 787 ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे, जे 11 वर्षे जुने होते.

Plane Crash Updates : अहमदाबादहून लंडनला जाणार होते विमान, २४२ प्रवासी होते..

अहमादाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये फक्त धुराचे लोट दिसत आहेत. धुराचे लोट पाहून विमानाला मोठा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे. अद्याप मात्र नेमकी जीवितहानी झाली का? याची माहिती मिळालेली नाही. हे विमान टेक ऑफ करतानाच कोसळलं असल्याचं बोललं जातंय. या विमानत एकूण 242 प्रवासी होते, असं सांगितलं जातंय. हे विमान लंडनला जात होतं. मात्र त्याआधीच या विमानाचा अपघात झाला.

Plane Crash Update : अहमदाबाद विमान अपघातात १३३ प्रवासी असल्याची माहिती..

अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात  प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. एअर इंडियाचं हे विमान असल्याचे समजते. घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

Ajit Pawar : योग्यवेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू..

योग्य वेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करु असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. कोणताही प्रश्न हा चर्चेने सुटतो. बच्चू कडू यांच्याशी चर्चा करायला राज्य सरकार तयार आहे. या संदर्भात सरकार आणि प्रशासन नियमित त्यांच्या संपर्कात असल्याचे अजित पवार म्हणाले. 

मोठी बातमी! गुजरातमध्ये प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळलं

गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाचे इंग्लंडला निघालेले प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले. जेथे विमान कोसळले होत भाग देखील रहिवासी आहे. प्राथामिक माहितीनुसार विमानत तब्बल 133 प्रवासी होते. या अपघातामध्ये मोठी जीवितहानी झाल्याची भीती आहे.

माळेगाव निवडणुकीच्या रिंगणात अजित पवारांची उमेदवारी कायम

माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उमेदवारी आज कायम राहिल्याचे स्पष्ट झाले, तर त्यांनी सात विद्यमान संचालकांना राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष व इतर सहयोगी पक्षाच्या नीळकंठेश्वर पॅनेलमध्ये अधिकृत उमेदवारी दिली.

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट

उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असताना मोठी घडामोड घडली आहे. राज ठाकरे आज (गुरुवारी) ताज लँड्स एन्ड हाॅटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची आल्याची माहिती आहे. राज ठाकरे हे आधी हाॅटेलमध्ये आले त्यानंतर फडणवीस तेथे आले.

अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसला दे धक्का

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना धक्का देण्याच्या तयारीत उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Ten-hour Working Hours Private sector : खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनो आता दहा तास काम करा, सरकारने केला नियमात बदल

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आंध्र प्रदेश सरकारने मोठा झटका दिला आहे. नियमात बदल करत चंद्रबाबू नायडू सरकारने तब्बल 10 तास काम करणे बंधनकारक केले आहे. या पूर्वी 9 तास काम करणे बंधनकारक होते. पूर्वीच्या नियमानुसार पाच तास काम केल्यानंतर कर्मचारी एक तासाला ब्रेक घेऊ शकत होते. आणि नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना दर तीन तासांनी ब्रेक घेता येईल. सरकारने कामाचे तास वाढवल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. 10 च्या ऐवजी कर्मचाऱ्यांकडून 12 तास काम करून घेतले जाईल, असा आक्षेप संघटनांनी घेत या निर्णयाला विरोध केला.

निधी नसेल तर लाडकी बहीण योजना बंद करा - राऊत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला जातोय. जर सरकारकडे निधी नसेल तर त्यांनी योजना बंद करावी, असा संताप काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी व्यक्त केला. तसेच जर योजना सुरू ठेवायची असेल तर अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करा, असा सल्ला देखील राऊत यांनी दिला.

ग्रामपंचायत आता क्युआरकोडद्वारे गोळा करणार कर

डिजिटल पेमेंटमध्ये आता ग्रामपंचायती देखील मागे राहणार नाहीत. पुणे जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील 263 ग्राम पंचायतीमध्ये क्युआरकोडद्वारे कर गोळा करण्याचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. यामध्ये भोर तालुक्यातील सर्व 156 गाव व जिल्ह्यातील पाच हजार लोकसंख्येपुढील 107 गावाचा समावेश आहे. आला आहे. क्युआरकोडद्वारे कर भरणे नागरिकांना देखील सोपे जाणार आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती नाही, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा

सरकारने मराठा समाजाला दिलेल्या एससीबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका करण्यात आल्या होत्या. या याचिकांमुळे वैद्यकीय महाविद्यालयातील मराठा समाजाच्या प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, कोर्टान या आरक्षणावर सुनावणी घेताना स्थिगिती दिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, याचिकांवरील सुनावणी 18 जुलैला होणार आहे. त्यामुळे या कायद्याचा लाभ घेऊन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्या अंतिम निकालाच्या आधीन राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.