पुणे - शहर आणि परिसरात १२ जून रोजी रात्रीपासून भयानक पावसाने हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि ढगफुटी सदृश पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील औंध, बोपोडी, पाषाण, सूस, महाळुंगे, कोथरूड आणि बावधन या भागांमध्ये गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
कोथरूड परिसरात जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे, तर बावधनमध्येही मुसळधार पाऊस कायम आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली असून, काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाल्याची माहिती मिळत आहे.
मुसळधार पावसाची फटका पुण्यासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांनाही बसला आहे.
अजूनही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.