Is Kaviya Maran getting married to Anirudh Ravichander? : सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण यंदा आयपीएलमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे तिची चर्चा सुरू आहे. ३३ वर्षीय काव्या लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. तिच्या विवाह सोहळ्याची तयारी सुरु झाल्याचंही सांगितले जात आहे. अशातच तिचा होणारा पती कोण आहे? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
काव्या मारन अनिरुद्ध रविचंदर यांच्याशी विवाह बंधनात अ़डकणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अनिरुद्ध रविचंदर हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आहेत. २०१२ मध्ये ‘व्हाय दिस कोलावेरी डी’ या गाण्याने ते रातोरात प्रसिद्ध झाले होते. १३ वर्षांपासून या क्षेत्रात असून त्यांनी रजनीकांत, कमल हसन, विजय आणि महेश बाबू यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केले आहे.
अनिरुद्ध यांचे वडील रवी राघवेंद्र हे अभिनेते, तर आई लक्ष्मी या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. विशेष म्हणजे, त्यांची काकू लथा सुपरस्टार रजनीकांत यांच्या पत्नी आहेत. तसेच त्यांचे आजोबा के. सुब्रमण्यम हे १९३० च्या दशकातील अग्रगण्य चित्रपट निर्माते होते.
यापूर्वी २०२३ मध्ये अनिरुद्ध यांचे नाव अभिनेत्री कीर्ती सुरेश हिच्याशी जोडले गेले होते, पण कीर्तीने या चर्चांना अफवा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मार्च महिन्यात अनिरुद्ध आणि काव्या मारन एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. यावर अनिरुद्धने काव्याबरोबर केवळ मैत्रीचं नातं असल्याची प्रतिक्रिया दिली होती. अशातच आता दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे चाहतेही उत्सूक आहेत.