बोधव ठाकरे आणि आदित्य ठाकरेवरील संजय शिरसाट: जर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला भेटायला बोलावलं, तर मी नक्की त्यांच्या भेटीला जाईन, असे वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले आहे. तर ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा शुक्रवारी (दि. 13) वाढदिवस होता. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे यांची भेटल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीला ब्रेक बसणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, सर्वात प्रथम आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेला आहे. उबाठा गट आणि मनसे एकत्र येत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राजकारणामध्ये कोणी एकत्र येऊच नये, अशी आमची आमची नाही.
राजकीय बाजू सोडून सुद्धा काही नाते आम्ही जपतो. राज ठाकरेंच्या घरी मी देखील गेलो होतो. मला उद्या जर उद्धव ठाकरेंनी बोलवले तर मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो. हा राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला भाग आहे. त्यामुळे राज ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. एकनाथ शिंदे यांना देखील भेटतात. मात्र, याचा अर्थ असा लावू नका की, उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं आणि संजय शिरसाट पळाले. अजित पवार आणि शरद पवार भेटत नाहीत का? तर ते भेटतात. त्यामुळे ही जी भेट झाली आहे त्यात काही राजकीय चर्चा होतात. परंतु, त्या सांगण्याचा अधिकार फक्त त्यांनाच प्राप्त होते, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाबद्दल त्यांना काय शुभेच्छा द्याल? असे विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा. पोराने चांगले राहावे, चांगले वागावे, चांगले बोलावे आणि लवकर लग्न करावे. वडिलांना सुद्धा त्रास होता कामा नये, याची काळजी घ्यावी. त्यांना फार फार शुभेच्छा. भविष्यात ते आणखी मोठे नेते व्हावेत, अशा आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा