Fathers Day Special: 'बाप होण्यापुढे सगळे आनंद ...'; संकर्षण कऱ्हाडेने 'फादर्स डे' निमित्त शेअर केली मर्मस्पर्शी कविता, पाहा व्हिडीओ
Saam TV June 15, 2025 07:45 PM

Fathers Day Special: आज म्हणजे १५ जून, २०२५ संपूर्ण देशभरात ‘फादर्स डे’ म्हणून साजरा केला जातोय. विविध कलाकार आणि नेटकरी सोशल मीडियावर आपल्या वडिलांसाठी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करत आहेत. त्यातच अभिनेता, कवी आणि लेखक संकर्षण कऱ्हाडेने इन्स्टाग्रामवर एक खास कविता आणि त्याचा व्हिडीओ शेअर करून सर्वांचे मन जिंकले आहे. त्यांच्या या शब्दांमध्ये वडिलांचे खूप मोठे स्थान आहे.

कवितेत म्हणतो, ““नाटकाचा प्रयोग प्रवास करून हा नट दमून जातो
पायाची लाकडं, चालत वाकडं घरी दमून येतो
वाटत असतं आपलं बुड आपल्याच घरात शांतपणे टेकवावं
थकून आलास रे आराम कर हे वाक्य मला कोणी तरी ऐकवावं
बायकोच्या नजरेत भाव असतात, आलं आमचं खुळं
आणि वाघाने फडशा पाडावा तसं अंगावर पडतात जुळं
माझ्या छातीपासून पोटापर्यंत ते खेळतात घसरगुंडी
अन् कुंभाराने माती तुडवावी तशी तुडवतात माझी मांडी
माझ्या उरल्या सुरल्या केसांची होते रोपवेची दोरी,
बापाच्या रूपाने त्यांना वाटतं गार्डनच आलंय घरी
पाठीच्या घोड्याला गुडघ्याच्या गाडीला घराचा प्रवास घडतो
तिकडून दिवसभर मी कशी सांभाळते हा मंत्र पडतो
मग मोबाईल चुंबक देऊन त्यांचं वळवायचं ध्यान,
ते रमलेत तोवर घ्या गिळून म्हणून समोर येतं जेवणाचं पान
वेगळं काहीतरी केलंय म्हणून समोर पानात असतात छोले
पहिला घास घेतला की पोरं करतात डायपर ओले
आपण भरेपर्यंत पोरांची भरलेली पोटं मोकळी होतात
ते जेवताना घासासोबत आपला जीवसुद्धा खातात
रात्र चढेल तसा रंगत जातो त्यांचा खेळ
कोल्हा आलाय बरं आता झालीय तुमची झोपायची वेळ
बरं पोरं झोपली आहेत तोपर्यंत तरी वाटतं ना काहीतरी व्हावं
बाळांना बाजूला करून आईला जवळ घ्यावं,
त्याच रात्री पोरं दोन वाजेपर्यंत जागतात
जरा झोपलेत असं वाटलं की उठून पाणी मागतात
मग कानाशी येऊन म्हणतात खरंच कोल्हा आला का?
नका चिडू ना बाबा तुम्हाला खरंच खूप त्रास दिला का?
बाबा म्हणतात सगळे आनंद बाप होण्यापुढे पायाची धूळ आहे
बाळांनो तुमच्यामुळे माझं घर भरलेलं गोकुळ आहे
बाळांच्या कुशीत त्यांचा बाप शांतपणे झोपतो
दुसऱ्या दिवशी बापातला नट जोमाने काम करतो

या व्हिडिओमध्ये संकर्षणने स्मार्ट म्हटलंय की, “लहान मुलं देवाघरची फुलं असं आपण म्हणतो; पण आजकालची लहान मुलं इतकी डेंजर आहेत की त्याला विचारू नका. थकून आलेल्या बापाला सुद्धा कोमेजून टाकतात अशी डेंजर मुलं आहेत. तर विशेषत: त्या वडिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठीची ही कविता.”

कवितेवरून रसिकांनीही प्रेम आणि प्रतिसाद दिला. अभिनेत्री आणि शुभांगी गोखले यांसारख्या कारकरांनी या कवितेवर आपली पसंती व्यक्त केली. कलाकार आणि त्याच्या चाहते “हे खूपच भारी आहे”, “बापांना अशी कविता सगळ्यांना मिळो” अशा कमेंट करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.