Navi Mumbai Shocking : प्रसिद्ध IT कंपनीमध्ये जॉबला, नैराश्यात नवी मुंबईतल्या नंदिनीचं टोकाचं पाऊल; पोलिसांना चिठ्ठी सापडली अन्...
Saam TV June 16, 2025 04:45 AM

विकास मिरगणे, साम टीव्ही

नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अवघ्या २२ वर्षांच्या तरुणीने घरातच आयुष्य संपवलं आहे. तरुणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना तपासानंतर तिच्याजवळ एक नोट सापडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोली सेक्टर 1 येथील ओंकार हाईट्स सोसायटीमध्ये पेईंग गेस्टमध्ये राहणाऱ्या नंदिनी नावाच्या 22 वर्षीय तरुणीने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणी विप्रो, आयटी पार्कमध्ये काम करत होती. तिच्यासोबत आणखी 3 मुली पेईंग गेस्टमध्ये सोबत होत्या. सुट्टी असल्याने इतर मुली आपापल्या घरी निघून गेल्या होत्या. त्यानंतर आज सकाळी दरवाजा उघडत नसल्याने 12 वाजताच्या सुमारास पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

नंदिनी ही मूळची कानपूरची होती. नंदिनी ही आर्थिक अडचणीमुळे नैराश्यात जीवन जगत होती. त्यातच घरात एकटी असलेल्या या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत रबाळे पोलिसांनी तपास केला. त्यांना तिच्या मृतदेहजवळ एक चिठ्ठी आढळून आली आहे. याबाबत रबाळे पोलिसांनी आकास्मित मृत्यूची नोंद केली आगे. या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांना कानपुरवरून बोलावण्यात आले आहे.

नाशकात १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या, प्रियकराला अटक

दरम्यान, नाशिकमध्ये बी.एस्सी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या युवतीने आत्महत्या केली होती. या प्रकरणात फरार असलेल्या विवाहित प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मेळा बस स्थानक परिसरातून कारवाई केली. राहुल अभिमन दासनूर असे संशियत आरोपीचे नाव आहे. युवतीने १३ एप्रिल रोजी पंचवटी परिसरात राहत्या घरी आत्महत्या केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.