सिंधुदुर्ग महाविद्यालयात योग दिन
esakal June 23, 2025 04:45 AM

72287

सिंधुदुर्ग महाविद्यालयात योग दिन
मालवण ः येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये एनसीसी विभाग, पोलिस दल मालवण आणि एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगशिक्षिका भक्ती जंगले यांनी योगाचे सर्व प्रकार करून दाखवत त्याचे महत्त्व सांगितले. तसेच सर्वांकडून वेगवेगळी योगासने करून घेतली. असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, सीनियर अंडर ऑफिसर गौरव चव्हाण आणि गीतांजली चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. यावेळी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि त्यांची टीम उपस्थित होती. पोलिसांच्या टीमने एक तासाचा योगा पूर्ण केला. प्रा. शिवराम ठाकूर यांनी योगाचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. ठाकूर यांनीही योगाची प्रात्यक्षिके सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रा. डॉ. उज्ज्वला सामंत, एनसीसी सीनियर निर्झरा कांबळी यांनी प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी एनएसएस विभाग प्रमुख डॉ. डी. व्ही. हारगिले आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.