पावसाळ्यात प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. निसर्गप्रेमी फिरण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहतात. या मोसमात अनेक ठिकाणचं सौंदर्य आणखीनच खूलते. पावसाळ्यात वातावरणात सर्वत्र थंडावा, आजूबाजूस हिरवीगार झाडे आणि कोसळणारा धबधबा दिसतो. यामुळे आपसुकच अनेकजणांचे फिरण्याचे प्लॅन सुरू होतात. मात्र, पावसाळ्यात फिरायला जाताना काही गोष्टींची काळजी नक्की घ्यायला हवी, कारण पावसामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी आपला प्रवास सुखकर आणि शांततेत व्हावा यासाठी प्रवासासाठी योग्य आणि सुरक्षित ठिकाण निवडणे गरजेचे आहे. याशिवाय सुरक्षेसाठी काही गोष्टीही लक्षात घ्यायल्या हव्यात. आज आपण जाणून घेऊया पावसात प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायल्या हव्यात
ठिकाण –
पावसाळ्यात सर्वच ठिकाणे फिरण्यासाठी योग्य नसतात. यावेळी पूर किंवा भूस्खलन्नाचा धोका असलेले ठिकाणे निवडणे टाळा. याऐवजी सरासरी पाऊस पडतो, अशा ठिकाणांची निवड करावी.
नियोजन –
फिरायला जाताना नेहमी ट्रिपचे नियोजन हवामानाचा अंदाज घेऊन करावे. मुसळधार पाऊस असेल तर फिरायला जाणे टाळा.
कपडे –
पावसाळ्यात सहजपणे वाळतील अशा कपड्यांची निवड फिरायला जाताना करावी. यासाठी तुम्ही हलके वजनाचे रेनकोट, नायलॉन, पॉलिस्टर कपडे घालू शकता. जीन्स घालणे टाळा.
चपला –
पावसाळ्यात चामड्याच्या शूजऐवजी वॉटरप्रूफ शूज वापरा. याशिवाय त्याला योग्य पकड देखील हवी आहे.
वॉटरप्रूफ कव्हर –
तुम्ही प्रवासाला जाताना कॅमेरा, मोबाईल आदी इलेक्ट्रोनिक वस्तू झाकण्यासाठी वॉटरप्रूफ वापरावेत. जेणेकरून या वस्तू पावसाने खराब होणार नाहीत.
पिण्याचे पाणी –
बाहेर असताना उघड्यावरचे पाणी पिणे टाळावे, त्याऐवजी तुम्ही पॅकबंद पाणी खरेदी करा किंवा घरूनच पाणी सोबत न्या.
गरम पदार्थ खा –
पावसात आरोग्यासाठी थंड पदार्थ टाळून गरम पदार्थ खावेत. बाहेर खाणार असाल तर उघड्यावरील टाळून चांगले स्वच्छ ठिकाणी खावे.
छत्री बाळगा –
तुमच्या बॅगेत एक छोटी छत्री कॅरी करा. यामुळे तुम्ही प्रवास करताना मदत होईल.
केस ड्रायर –
पावसाळ्यात प्रवास करताना हेअर ड्रायसोबत ठेवा. जेणेकरून तुम्ही पावसात भिजलात तर केस, कपडे सुकवता येतील.
औषधे सोबत ठेवा –
पावसाळ्यात प्रवास करताना काही औषधे सोबत ठेवावी. विशेष करून तुमच्यासोबत जर जेष्ठमंडळी किंवा लहान मुले असतील.
हेही पाहा –