बँड वादनाने विद्यार्थ्यांचे स्वागत
esakal June 17, 2025 12:45 AM

भिवंडी, ता. १६ : शहरातील एनईएस इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि ज्यु. कॉलेजमध्ये भारतीय मूल्य, पारंपरिक उत्सव आणि सण यांची नेहमीच जपणूक केली जाते. याच अनुषंगाने शाळेचा पहिल्या दिवशी बँड वादनाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी ‘चल, शाळेला चल चल तारा’ या गाण्यावर शिक्षकांसह मुले थिरकली. याप्रसंगी प्राचार्य किरण वानखेडे यांचे भाषण झाले. पर्यवेक्षक विनोद ढेरंगे आणि सोमेश्वर रापोल यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाताळली. या वेळी मुलांना ‘दैनिक सकाळ’चे विनामूल्य वाटप करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.