मुंबई : पावसाने रविवार रात्रीपासून मुंबई आणि परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच राहिल्याने उपनगरीय रेल्वेचा वेग काहीसा मंदवाला होता. यामुळे सकाळच्या वेळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. तर दुपारपासून ठाणे-कल्याण भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या अप मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.
सोमवारी पहाटेपासून , नवी मुंबई, ठाणेमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले नसले तरी हवेतील दृष्यमानता कमी झाल्याने लोकलच्या वेगावर मात्र परिणाम झाला. दृष्यमानता कमी असल्याने लोकलचा वेग करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने मोटरमनला दिल्या होत्या. त्यामुळे लोकलच्या वेगावर निर्बंध आल्याने लोकलची धाव धिमी झाली.
परिणामी लोकलच्या एकामागोमाग एक रांगा लागल्या. यामुळे गाड्यांचे बंचिग झाले. कल्याण ते सीएसएमटी दरम्यानच्या लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावू लागल्याने लोकलला प्रवाशांची एकच गर्दी झाली. तसेच लोकल धिम्या गतीने धावू लागल्याने अनेक स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. हार्बर मार्गावरील मानखुर्द स्थानकानंतर लोकलचा वेग मंदावला होता. त्यामुळे पनवेल ते सीएसएमटी दरम्यानच्या प्रवासाकरिता दीड तासापेक्षा जास्त कालावधी लागला.
प्रवाशांचा खोळंबामध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वातानुकूलित लोकल प्रचंड विलंबाने धावत असल्याने, प्रवाशांचा खोळंबा झाला. लोकल उशिरा धावत असल्याने रेल्वे स्थानक आणि लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. तर, मेल, एक्स्प्रेस कूर्मगतीने धावत असल्याने, लोकलचे वेळापत्रक आणखी बिघडले . पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी लोकलचे वेळापत्रक काहीसे कोलमडल्याने प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागला.
रस्ते वाहतुकीचा वेग मंदावलापाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. यावेळी वाहतूक गोखले ब्रिज मार्गे वळविण्यात आलेली असून वाहतूक संथ गतीने सुरू होती. तर पाणी साचल्याने रामनगर सबवे येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती.
जयकर रोड ते ठाकूर द्वार रोड (काळबादेवी) दरम्यान रस्ता खचल्यामुळे वाहतूक बंद केली होती. परिणामी येथील वाहतूक एम.के.रोड (गिरगांव) मार्गे वळविण्यात आलेली असून वाहतूक संथ गतीने सुरु होती. पाणी साचल्याने वाकोला पूल उतरण येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती.