सागर आव्हाड, साम टीव्ही
सर्वसामान्यांना महागाईने पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी)ने दूध दरात वाढ केली आहे. कात्रज डेअरीने दूधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या वाहतूक आणि इतरद खर्चात वाढ झाल्यान दूध विक्रीदर वाढवण्यात आल्याचे संघाने सांगितलं आहे.
दूध उत्पादक संघाच्या निर्णयानंतर आज सोमवारी मध्यरात्रीपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे यांनी सांगितलं आहे. डेअरीने मे महिन्यात फुल क्रीम दूध आणि प्रमाणित दूधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे टोण्ड दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
मे महिन्यात टोण्ड दरामध्ये वाढ करण्यात आली नव्हती, असं डेअरी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, आता वाढ केल्याने पुणेकरांच्या खिशाला प्रति लिटरप्रमाणे दोन रुपयांची झळ बसणार आहे.
दूध प्रकार----जुने दर----नवीन दर
टोण्ड दूध (१ लिटर)--५५रुपये--५७रुपये
टोण्ड दूध (अर्धा लिटर)--२८रुपये--२९रुपये
टोण्डदूध(पाव लिटर)--१३रुपये--१४ रुपये
------------------