देशातील सर्वात महागडी पार्किंग, 24 तासांचे भाडे 2400 रुपये, अधिकाऱ्यांनाही घाम फुटला
GH News June 17, 2025 09:08 PM

पार्किंग तिकिटानुसार दुचाकी/सायकलचे 24 तासांचे भाडे 2400 रुपये होते. एका तासापेक्षा जास्त वेळ गाडी ठेवली तर प्रत्येक तासाला शंभर रुपये आकारले जातील, असे तिकिटावर लिहिले होते. महमूरगंज येथील रहिवासी डॉ. राजेश कुमार श्रीवास्तव यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. श्रीवास्तव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील वाहन स्टँड बाईकचा दर 24 तासांसाठी 2400 रुपये निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच प्रति तास 100 रुपये आकारले जात आहेत. एका सायकलसाठी 24 तासांसाठी 1200 रुपये आकारले जात आहेत. ही तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

ईशान्य रेल्वेच्या वाराणसीतील एका रेल्वे पार्किंगचे तिकीट व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पार्किंग तिकिटानुसार एका तासापेक्षा अधिक तासासाठी 100 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. हे तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पार्किंग ऑपरेटरवर ही कारवाई केली. रेल्वे स्थानक प्रशासनाने पार्किंगचा ठेका रद्द केला. कंत्राटदारावर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. एका तासापेक्षा जास्त वेळ गाडी ठेवली तर प्रत्येक तासाला शंभर रुपये आकारले जातील, असे तिकिटावर लिहिले होते. म्हणजेच 24 तासांसाठी 2400 रुपये मोजावे लागतील.

महमूरगंज येथील रहिवासी डॉ. राजेश कुमार श्रीवास्तव यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. श्रीवास्तव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील वाहन स्टँड बाईकचा दर 24 तासांसाठी 2400 रुपये निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच प्रति तास 100 रुपये आकारले जात आहेत. एका सायकलसाठी 24 तासांसाठी 1200 रुपये आकारले जात आहेत.

पार्किंग चालकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एफआयआर दाखल करण्यात आला. सर्व तिकिटे जप्त करण्यात आली. ज्या पार्किंगमध्ये हा गोंधळ झाला, ती पिक अँड ड्रॉप ची जागा होती. पार्किंग ऑपरेटरच्या म्हणण्यानुसार, हे तिकीट पिक अँड ड्रॉपसाठी होते, त्यावर किंमत लिहिली होती. ते रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार होते, पण त्यावर टायपिंगची चूक झाली होती, असा ऑपरेटरचा दावा आहे. आता १०० रुपये हा २४ तासांचा नियम आहे. त्यानुसार तिकिटे आकारली जात आहेत.

वाराणसी ईशान्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार यांनी एका वाहिनीला बोलताना सांगितले की, पार्किंग ऑपरेटरविरोधात जादा पैसे आकारल्याच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा करार रद्द करण्यात आला आहे. पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सर्व तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.