तुमचंही मूल बिछान्यात शू करतंय ? आजीबाईंच्या बटव्यातून रामबाण उपाय
esakal June 18, 2025 08:45 AM
Health Benefits of Ajwain ओवा – घरातला रामबाण उपाय

ओवा म्हणजेच अजवाईन! घराघरात वापरला जाणारा हा मसाल्याचा पदार्थ अनेक रोगांवर उपयोगी ठरतो.

Health Benefits of Ajwain बाळाच्या पोटदुखीवर उपाय

ओव्याची पुरचुंडी गरम करून बाळाच्या पोटावर शेक दिल्यास पोटदुखीवर त्वरित आराम मिळतो.

Health Benefits of Ajwain सर्दीवर ओव्याची धुरी

सर्दी झाली असल्यास ओव्याची धुरी घेतल्याने नाक मोकळं होतं आणि थंडी कमी होते.

Health Benefits of Ajwain वारंवार लघवी थांबवण्यासाठी उपाय

२ ग्रॅम ओवा आणि २ ग्रॅम गूळ यांचे ४ गोळे तयार करून दिवसभरात खाल्ल्यास वारंवार लघवी येणे थांबते.

Health Benefits of Ajwain बिछान्यात लघवी नियंत्रणात

लहान मुलांना बिछान्यात लघवी होण्याचा त्रास असल्यास रात्री झोपताना अर्धा ग्रॅम ओवा दिल्यास फरक जाणवतो.

Health Benefits of Ajwain ढेकर थांबवण्यासाठी ओवा

वारंवार ढेकर येत असतील तर थोडा ओवा तोंडात टाकून चावून खाल्ल्यास लगेच आराम मिळतो.

Health Benefits of Ajwain जखम भरून येते ओव्याच्या लेपाने

ओव्याचा लेप करून जखमांवर लावल्यास सूज कमी होते आणि जखम भरून येते.

Health Benefits of Ajwain पचन सुधारण्यासाठी ओव्याचं पाणी

ओवा पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास अपचन, गॅस आणि पोटफुगी यावर फायदा होतो.

Health Benefits of Ajwain ओव्याचा रोजचा वापर आरोग्यास हितकारक

थोडा ओवा रोजच्या आहारात घेतल्यास पचनक्रिया चांगली राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Yoga for Children लहान मुलांनी योगासने करताना 'या' चूका टाळा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.