Maharashtra politics live update : राज ठाकरेंची आज तातडीची पत्रकार परिषद
Sarkarnama June 18, 2025 01:45 PM
kedarnath helicopter crash : केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जयस्वाल कुटुंबियांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार

रविवारी (15 जून) केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि दोन वर्षांची काशी जयस्वाल या तिघांवर आज वणीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरेंची आज तातडीची पत्रकार परिषद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे आज सकाळी 11.30 वाजता दादर येथील शिवतीर्थावर एका तातडीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

MNS And Shivsena UBT : ठाकरेंची शिवसेना अन् मनसे आज एकत्र येणार

आज मनसे आणि ठाकरेंची शिवसेना इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. आज11 वाजता प्रादेशिक मुंबईतील कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे वरळी विभाग अध्यक्षांच्या उपस्थितीत हे आंदोलन केलं जाणार आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्ही एकदा जोर आला आहे.

Ashadhi wari 2025: तुकाराम महाराजांच्या पालखी आज देहूतून प्रस्थान करणार

जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखीआज बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra education policy : पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी असणार तृतीय भाषा

राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासूनच त्रिभाषा सूत्र स्वीकारले असून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा ही हिंदी अनिवार्य असेल असा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे आता इथून पुढे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.