Latest Maharashtra News Updates : मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी
esakal June 18, 2025 06:45 PM
Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईत काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत जोरदार पावसानं हजेरी लावलीय. तर काही भागात ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Live : यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना जामीन मंजूर...

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याप्रकरणी लय भारी यूट्यूब चैनल चे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी विविध गुन्ह्यामध्ये अटक केली होती या प्रकरणात 102 दिवसांच्या कारावासानंतर पत्रकार तुषार खरात यांची वडूज सत्र न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. ॲट्रॉसिटी, विनयभंग,खंडणी अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अटक केली होती. कारागृहामध्ये असताना त्यांनी अन्न त्याग आंदोलन देखील केले होते..

War Live : इराण इस्त्रायल युद्धाला अधिकृत सुरुवात इराणकडून घोषणा

इराण इस्त्रायल युद्धाला अधिकृत सुरुवात झाली आहे. इराणने यासंदर्भातील घोषणा केली आहे. रात्री इराणकडून इस्त्रायलच्या काही ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.

KDMC Election Live : निवडणुकीच्या तोंडावर 27 गावांचा प्रश्न ऐरणीवर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण जोडी 27 गावांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे . एकीकडे 27 गाव संघर्ष समितीकडून या 27 गावांचे स्वतंत्र नगरपालिका करण्याचे मागनी पुन्हा एकदा केली जाते तर दुसरीकडे 27 गावे केडीएमसीतच राहावीत यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे संदीप पाटील यांनी 27 गावे आता निघणार नाहीत असे मत ठामपणे व्यक्त केलंय . त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचा निवडणुका या 27 गावासहहोतात की 27 गाव वगळून होतात याकडे आता सर्वांचेच जास्त लक्ष लागलं आहे.

Mumbai Live : मुंबई गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर खड्डे

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करीत असताना पुन्हा खड्डयांचा त्रास सहन करवा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गाचे बऱ्याचअंशी काँक्रिटीकरण पुर्ण झाले असले तरी माणगाव, रोहा आणि पेण परिसरात उड्डाण पुलांची काम अपूर्ण आहेत. यादरम्यान तयार केलेल्या सर्व्हिस रोडची पावसाचे पाणी साचुन पार दुरावास्था झाली आहे. गडब, नागोठणे आणि लोणेरे येथील या सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले असून यातुन मार्ग काढताना वाहन चलकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्याव अशी मागणी केली जात आहे

Mumbai Live : राज ठाकरेंची आज तातडीची पत्रकार परिषद

राज ठाकरे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद बोलवली आहे. सकाळी ११.३० वाजता ही पत्ररकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Former Nipani MLA Kakasaheb Patil Passes Away : निपाणीचे काँग्रेसचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन

निपाणी : येथील माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील (वय ७१) यांचे बेळगाव येथील रुग्णालयात बुधवारी (ता. १८) अल्पशा आजाराने निधन झाले. माजी आमदार काकासाहेब पाटील (Kakasaheb Patil Passes Away) यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांना गेले ४० दिवस बेळगावमधील केएलई रुग्णालयात (KLE Hospital) दाखल करण्यात आले होते.

Sant Tukaram Maharaj Palkhi : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून आज पंढरपूरकडे प्रस्थान

देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा बुधवारी (ता. १८) दुपारी अडीच वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी या सोहळ्यासोबत जाणारा लाखो वैष्णवांचा मेळा देहू येथे मंगळवारी सायंकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने दाखल झाला असून टाळ मृदंगाच्या गजराने देहूनगरी दुमदुमली आहे. प्रस्थानानंतर पालखी सोहळा दुसऱ्या दिवशी पंढरपूरकडे मार्गस्थ होतो.

Iran-Iraq Conflict : तेहरानमधून तातडीने बाहेर पडा, केंद्राचे भारतीय विद्यार्थ्यांना निर्देश

Latest Marathi Live Updates 18 June 2025 : निपाणी येथील माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील (वय ७१) यांचे बेळगाव येथील रुग्णालयात आज अल्पशा आजाराने निधन झाले. तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा बुधवारी (ता.१८) दुपारी अडीच वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इराण आणि इस्राईल यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असल्याने भारत सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी करत इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना तेथून बाहेर पडण्यास सांगितले आहे. बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी भाजपने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार निदर्शने केली. सोन्याच्या फसवणूकप्रकरणी बंगळूरमधील पहिल्या सीसीएच न्यायालयाने मंगळवारी अभिनेत्री ऐश्वर्या गौडा हिला सशर्त जामीन मंजूर केला. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.