इस्रायलवर बॉम्बचा वर्षाव, हिंदुस्थानी नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Marathi June 18, 2025 07:24 PM

इराणकडून इस्रायलवर सतत हल्ले सुरू आहेत. या बॉम्बच्या हल्ल्यामुळे एका हिंदुस्थानी नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती कामानिमित्त इस्रायला गेली होती.

रवींद्र हे तेलंगणाचे असून पत्नी विजयलक्ष्मीसोबत इस्रायलला गेले होते. त्यांना विजिट विजावर पार्ट टाईम काम मिळाले होते. पण इराण आणि इस्रायलचा संघर्ष वाढला. त्यात इराणने प्रत्युत्तरादाखल ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले.

विजयलक्ष्मी म्हणाल्या की या सतत होणाऱ्या स्फोटांमुळे रवींद्र अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाजवळच एक स्फोट झाल्यामुळे रवींद्र यांनाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी विजयलक्ष्मी यांना त्यांच्या पतीच्या निधनाची माहिती दिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. विजयलक्ष्मी यांनी तेलंगाणा सरकार आणि केंद्र सरकारडे आपल्या पतीचे शव हिंदुस्थानात आणण्यासाठी मदत मागितली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.