चिंचवड, ता.१८ ः ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेत भर घालण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी चिंचवड यांच्यावतीने आयोजित रोटरी हॅप्पी स्कूल प्रकल्पा अंतर्गत करमाळा तालुक्यातील दोन शाळांना संगणक संच, प्रिंटर, ध्वनीक्षेपक प्रणाली, जलसुविधा आणि क्रीडा साहित्यांचे वाटप करण्यात आले.
संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय, भोगेवाडी आणि अजितदादा पवार माध्यमिक विद्यालय, वडशिवणे या शाळांमध्ये या सुविधा पुरवण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष गोविंद जगदाळे होते.
शाळेतील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबचे सुभाष वाल्हेकर, गणेश बोरा, वसंत ढवळे, शशांक भूमकर, गोविंद चितोडकर, नीलेश सोनवणे, भरत चव्हाण, अभिषेक वाल्हेकर, जयश्री भामरे व वसंत भामरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.