तेहरान : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला सहा दिवस पूर्ण होत आली आहेत आणि सध्या युद्धाचा सातवा दिवस सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, इराणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी (Ayatollah Ali Khamenei) यांचे पुतणे महमूद मोर्दाखानी (Mahmoud Moradkhani) यांनी त्यांच्या काकांच्या राजवटीवर थेट टीका केलीये. ' रिपब्लिकचा अंतच शांततेचा एकमेव मार्ग आहे,' असं त्यांनी म्हटलंय.
'या राजवटीचा नाश आवश्यक'महमूद मोर्दाखानी, जे १९८६ मध्ये इराणमधून पळून गेले आणि आजतागायत खमेनींच्या इस्लामी राजवटीचे प्रखर विरोधक राहिले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलंय की, 'जो कोणी या राजवटीचा अंत करू शकेल, त्याची आवश्यकता आहे. इस्रायल आणि इराणमधील युद्ध एक दुर्दैवी गोष्ट आहे, परंतु ते एका अशा व्यवस्थेचा परिणाम आहे जी बदल स्वीकारत नाही आणि स्वतःमध्ये सुधारणा करू इच्छित नाही.'
'खमेनी गेले, तरी प्रश्न सुटतील का?''खमेनींच्या मृत्यूनंतर सगळं ठीक होईल का?' या प्रश्नावर मोर्दाखानी म्हणाले, केवळ एका व्यक्तीच्या जाण्याने संपूर्ण व्यवस्था बदलणार नाही, कारण ही एक रचना आहे, जी बदला घेण्यावर आणि सत्तेच्या टिकवणुकीवर आधारित आहे.'
'इस्लामी रिपब्लिकचा अंत म्हणजेच शांतीचा खरा मार्ग'मोर्दाखानी यांच्या मते, इस्लामी रिपब्लिकचा अंत म्हणजेच शांतीचा खरा मार्ग आहे. इराणमध्ये सध्या इंटरनेट बंद आहे, त्यामुळे मोर्दाखानी आपल्या समर्थकांशी थेट संवाद साधू शकत नाहीयेत. तरीही, त्यांनी सांगितलं की, 'इराणमध्ये अनेक लोक राजवटीच्या असुरक्षिततेची आणि अस्थिरतेची लक्षणं पाहून आनंदी आहेत.' त्यांनी इशारा दिला, की ही व्यवस्था बदला घेण्यास मागे-पुढे पाहणार नाही.
अमेरिका देखील युद्धात अधिक सक्रिय?दुसऱ्या बाजूला, देखील या युद्धात अधिक सक्रिय होत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याला हल्ल्याची योजना तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिका आणि इस्रायल एकत्रितपणे इराणच्या अण्वस्त्र योजनांविरोधात कारवाईस सज्ज आहेत. त्याचवेळी, इराणचे परराष्ट्रमंत्री यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की 'इराण कधीच अण्वस्त्रांच्या बाजूने नव्हता, त्यांच्या सर्व कारवाया स्वसंरक्षणाच्या अधिकारात येतात.'