BAN vs SL : तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचं कमबॅक, बांगलादेशच्या 495 धावांना तगडं उत्तर
GH News June 20, 2025 12:06 AM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या चौथ्या पर्वात श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यातील तीन दिवसांचा खेळ संपला असून दोन्ही बाजूंनी तगडी लढत दिली जात आहे. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि सर्व गडी बाद 495 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करणं श्रीलंकेला शक्य आहे की नाही असं वाटत होतं. पण श्रीलंकेने कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक केलं. तिसऱ्या दिवशी 4 गडी गमवून 368 धावा केल्या. यात पाथुम निस्संकाने 256 चेंडूत 23 चौकार आणि 1 षटकार मारत 187 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे बांगलादेशचा संघ बॅकफूटवर गेला. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेचा संघ 127 धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा कामिंदु मेंडिस नाबाद 37 आणि धनंजय डिसिल्वा नाबाद 17 धावांवर खेळत आहेत. त्यामुळे चौथ्या दिवशी श्रीलंकन संघ कशी कामगिरी करतो यावर सामन्याचा निकाल लागणार आहे. अन्यथा हा सामना ड्रॉ होण्याची शक्यता अधिक आहे.

पाथुम निस्संका आणि लहिरू उदरा यांनी श्रीलंकेकडून डावाची सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या दोन्ही खेळाडूंकडून 47 धावांची भागीदारी झाली. पण तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर लहिरू उदारा बाद झाला. त्याने 34 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी पाथुम निस्संका आणि दिनेश चंडिमल यांनी 157 धावांची भागीदारी केली. दिनेश चंडिमल 119 चेंडूंचा सामना करून 4 चौकार मारत 54 धावा केल्या. नईम हसनच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. अँजेलो मॅथ्यूजने शेवटच्या सामन्याच्या पहिल्या डावात 39 धावांची खेळी केली आणि बाद केलं. त्यानंतर पाथुम निस्संकाने 187 धावा करून तंबूत परतला.

बांगलादेशकडून हसन महमुद, तैजुल इस्लाम, नईम हसन आणि मोनिमुल हक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हसन महमुदने 12 षटकात 49 धावा देत एक गडी, तैजुल इस्लामने 34 षटकात 126 धावा देत एक गडी, नईम हसनने 25 षटकात 86 धावा देत एक गडी आणि मोनिमुल हक यांनी 6 षटकात 24 धावा देत एक गडी बाद केला. तर नाहिद राणा याला एकही विकेट बाद करता आलं नाही. त्याने 16 षटकात 80 धावा दिल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.