Uddhav Thackeray criticizes Nitesh Rane, saying that BJP is a frog screaming
Marathi June 20, 2025 02:25 PM


हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटावर नेहमी टीका करणाऱ्या नितेश राणे यांची उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात इज्जतच काढली.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा 59 वा वर्धापन दिन मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळ बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटावर नेहमी टीका करणाऱ्या नितेश राणे यांची तर उद्धव ठाकरे यांनी इज्जतच काढली. (Uddhav Thackeray criticizes Nitesh Rane, saying that BJP is a frog screaming)

उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडणं लावली जात आहेत. भाजपाचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढंच काम दिलेलं आहे. पण त्याची उंची केवढी आणि त्याचा आवाज कसा? उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा आहे. डोळे कोणासारखे आहेत हे माहिती नाही. पण त्याचा जीव काय आणि तो बोलतो काय? त्याची पार्श्वभूमी काय आहे? त्याच्या वडिलांची पार्श्वभूमी काय आहे? आणि तो आमच्यावरती बोलतोय. कोणतातरी एक बाप ठरव. मी याच भाषेत त्यांना बोलतोय, हे त्यांना कळू द्या, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता नितेश राणे यांची इज्जत काढली. तसेच आज शिवसेना 59 वर्षांची झाली आहे. तरीही आमचा नेता आणि भगवा एकच आहे. दैवत व विचारही एकच आहे, उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – Uddhav Thackeray : ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या; गोंधळ झाल्यावर उद्धव ठाकरेंनी भाषण थांबवलं

पाळीव बेडके डोळ्यासमोर येतात

भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, ते आमच्यावर टीका करतात. अरे पण तुला पोरं होत नाहीत, तर आम्ही काय करू? पण भाजपाचे लोक असेच आहेत. आपण सत्य नाकारतो का कधी? त्यांना आजपर्यंत कधी पोरं झाली नाही. म्हणून दुसरे नेते स्वीकारायचे आणि त्यांना मोठं करायचं. दुर्देव असे की ज्या सरदार पटेलांनी संघावर बंदी घातली. त्याच सरदार पटेलांचा सर्वात मोठा पुतळा त्यांनी उभारला. हे यांचे हिंदुत्व. भाजपाने पाळलेली बेडकं आज डराव डराव करतील. ही पाळीव बेडके डोळ्यासमोर येतात. या चोरांना खरंच मी म्हणेल, लाज लज्जा शरम नाही. असा हा भाजपा पक्ष, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी घणाघाती टीका केली.

हेही वाचा – Shinde VS Thackeray : ठाकरे म्हणाले, कम ऑन किल मी; शिंदे म्हणतात, इंग्लिश पिक्चर बघून आले वाटतं



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.