Solapur News : स्वच्छता मोहिमेत १५ टन माती, आजोरा उचलला; शहरातील मुख्य रस्त्याची स्वच्छता मोहीम
esakal June 20, 2025 02:45 PM

सोलापूर : महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत गुरुवारी तिसऱ्या दिवशी शहरातील विविध आठ रस्त्यांची स्वच्छता करताना १५ टन माती व आजोरा उचलण्यात आला. सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांनी विविध आठ मार्गावरील कामाची पाहणी केली.

Success Story: 'अंगणवाडी सेविका ५४ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण'; गोरेवाडीच्या इंदिरा घाडगेंची जिद्द, इच्छाशक्ती प्रबळ

शहरातील मुख्य रस्त्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. विभागीय कार्यालय १ ते ८ मध्ये सुरू असून या मोहिमेमध्ये गुरुवारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वे स्टेशन, धरम काटा चौक ते दयानंद कॉलेज, रुपाभवानी चौक ते धरम काटा चौक, बनशंकरी चौक ते विजयनगर बस स्टॉप, एचएसआर पाणी टाकी ते बनशंकरी चौक, विजापूर नाका ते पनाश अपार्टमेंट, पत्रकार भवन ते सात रस्ता, डीआरएम ऑफिस ते डफरीन चौक आदी आठ रस्त्यांवर मोहीम राबविण्यात आली.

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी सुरू असलेल्या मोहिमेची पाहणी केली. यावेळी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्या सहअधिकारी, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

साेलापूर हादरलं! 'घरात गळफास घेऊन युवक-युवतीने संपवले जीवन'; कर्णिक नगरातील घटना; चिठ्ठी लिहून उचलले टोकाचे पाऊल बीपीएमएसमधील बांधकाम तक्रारी शुक्रवारी जाणून घेणार

सोलापूर महापालिकेच्या वतीने बांधकाम परवानगी ऑनलाइन करण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील बीपीएमएसमधील प्रलंबित बांधकाम परवानगीबाबत तक्रार असल्यास आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना दर शुक्रवारी दुपारी ११ ते १२ दरम्यान नागरिकांना भेटता येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.