International Yoga Day 2025 : दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त योगासने
Marathi June 20, 2025 07:25 PM

योगा केवळ शारीरिक आरोग्यासाठी नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. हल्लीच्या डिजिटल युगात, बहुतेकजण दिवसभर मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात, ज्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन मानसिक आरोग्यासह दृष्टीवर परिणाम होत आहे. कमी वयात मुलांना चष्मा लागत आहे. प्रौंढानाही डोळ्यांच्या इतर समस्या उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत. तुम्ही दृष्टी सुधारण्यासाठी योगा करायला हवा. नियमितपणे योगा केल्याने दृष्टी सुधारण्यासाठी मदत होते. उद्या अर्थात 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होणार आहे. या दिनानिमित्त आज आपण जाणून घेऊयात दृष्टी सुधारण्यासाठी कोणती योगासने करणे फायदयाचे ठरेल (Useful yoga poses to improve vision).

शावसन

शवासन शरीराला खोलवर शांती देते आणि मानसिक ताण कमी करते. शवासन डोळ्यांवरील ताण कमी करतो.

सर्वंगसन

सर्वांगासन हे डोक्याखाली पाय करून केले जाते. ज्यामुळे डोक्याकडे रक्तपुरवठा वाढतो आणि दृष्टी सुधारते.

(भ्रमारी प्राणायाम)

भाम्ररी हा शरीर शांत करणारा प्राणायाम आहे. यामुळे मानसिक ताण कमी होतो. परिणामी, डोळ्यांमधील जळजळ, कोरडेपणा आणि थकवा कमी होतो.

ट्राटॅक

त्राटक हा एकाग्रतेचा व्यायाम आहे. यामध्ये एखादी व्यक्ती डोळे मिचकवल्याशिवाय जळत्या मेळबत्तीकडे पाहत राहते. या योगाच्या सरावामुळे डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात आणि एकाग्रता सुधारते. तसेच दृष्टी तीक्ष्ण होते.

Saपasमिंग (पॅमिंग)

पामिंग करताना हाताचे तळवे एकमेकांवर घासले जातात आणि नंतर बंद डोळ्यांवर हळूवारपणे फिरवले जातात. या संपूर्ण क्रियेमुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो आणि दृष्टी सुधारते.

डोळे फिरवणे (Eye Rotation exercises)

डोळे फिरवण्याच्या योगामुळे डोळ्याची वर-खाली, उजवी-डावीकडे, गोलाकार अशी हालचाल होते. यामुळे डोळ्यांच्या नसा सक्रिय होतात आणि दृष्टी सुधारते.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=fxcnpfudqq

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.