नवी दिल्ली : बुद्धिबळ क्षेत्रात प्रगती करीत असलेल्या भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला. नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने लंडन येथे सुरू असलेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स सांघित अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चीनच्या होऊ यिफान हिचा धक्कादायक पराभव केला.
दिव्याच्या या विजयामुळे भारताला ब्लिट्स प्रकारात तिसरा क्रमांक मिळाला आहे. तर रॅपिडमध्ये दुसरा क्रमांक हस्तगत केलेला आहे.
आपल्या या सनसनाटी विजयाबद्दल बोलताना दिव्या म्हणाली, जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स स्पर्धेतील अखेर एक मोठे स्वप्न पूर्ण होत आहे. आम्ही रॅपिड प्रकारात दुसरे तर ब्लिट्समध्ये तिसरे स्थान मिळवले हे फार मोठे यश आहे. एक चांगला अनुभव आम्हाला मिळाला.
Tennis Players : देशासाठी खेळण्यास नकार देणाऱ्यांचे आर्थिक सहाय्य काढून घेऊ; भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा टेनिसपटूंना आदेशब्लिट्स प्रकारात दिव्याने लक्षवेधक कामगिरी करताना सहा विजय मिळवले. एका सामन्यात तिचा पराभव झाला तर एक सामना अनिर्णित राहिला. दिव्याच्या या खेळाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आणि सोशल मीडियाद्वारे तिचे अभिनंदनही केले.