गोव्यातील पर्पल फेस्ट ०९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.
साखळीत ड्रिंक अँड ड्राईव्ह, हिट अँड रननंतर फरार झालेले अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यातमद्यधुंद अवस्थेत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या कारने दुचाकीला साखळी येथे जोराची धडक दिली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. कारचालक मुलगा आणि इतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्यानंतर सर्वांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
कोलवा येथे बैलांची बेकायदेशीर झुंज; दोघांविरोधात गुन्हाकोलवा येथे बैलांची बेकायदेशीर झुंज आयोजित केल्याप्रकरणी लियाकत अली शेख आणि कोणसेसाव रॉड्रिग्ज यांच्याविरोधात कोलवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. बेताळभाटी येथे खुल्या मेदानात ही झुंज आयोजित करण्यात आली होती. प्राण्यांविरोधात क्रूरता केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.