Maran Vs Maran: काव्या मारनच्या घरात वाद! 24,000 कोटींच्या साम्राज्यासाठी दोन भाऊ आमनेसामने; काय आहे प्रकरण?
esakal June 20, 2025 02:45 PM

Sun TV Group: भारतातील सर्वात मोठ्या मीडिया चॅनेलपैकी एक असलेल्या सन टीव्ही नेटवर्कमधील कौटुंबिक वाद समोर आला आहे. हा केवळ कोर्टरूम ड्रामा नाही तर हजारो कोटी रुपयांची सत्ता आणि नियंत्रणासाठीचा लढा आहे. या वादामुळे काव्या मारनचे वडील आणि काका समोरासमोर आले आहेत. हा वाद तब्बल 24 हजार कोटी रुपयांच्या साम्राज्याची सत्ता आणि मालकी कोणाकडे असणार, यावरून झाला आहे.

खरं तर, द्रमुक खासदार दयानिधी मारन यांनी त्यांचे भाऊ आणि सन टीव्हीचे प्रमुख कलानिधी मारन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, ज्यात त्यांनी फसवणूक, मनी लाँडरिंग आणि सत्ता हडपल्याचा दावा केला आहे. प्रश्न फक्त शेअर्सचा नाही तर 24 हजार कोटी रुपयांच्या साम्राज्याचा वारस कोण असणार हा आहे.

काय आहे हा वाद?

दयानिधी मारन यांनी 10 जून 2025 रोजी आपल्या भावाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यात असं म्हटलं आहे की, सन टीव्ही नेटवर्कमधील शेअर्सचे नियंत्रण 2003 नंतर बेकायदेशीररीत्या बदलण्यात आले. या नोटीसमध्ये मनी लॉन्ड्रिंग, फसवणूक, गुन्हेगारी आणि विश्वासघाताचे आरोप आहेत. ही नोटीस केवळ कलानिधी मारनच नव्हे, तर त्यांची पत्नी कावेरी मारन आणि अन्य 7 लोकांना पाठवण्यात आली आहे.

US Fed Meeting: इस्रायल-इराण युद्धादरम्यान, अमेरिकन फेडरल रिझर्व्हने घेतला मोठा निर्णय, काय परिणाम होणार? दयानिधी यांचे नेमके आरोप काय आहेत?
  • वडील एस.एन. मारन यांचं निधन झाल्यानंतर शेअर्स बेकायदेशीरपणे आई मल्लिका मारन यांच्या नावे ट्रान्सफर करण्यात आले.

  • यानंतर हे शेअर्स कलानिधी मारन यांना दिले गेले – तेही कोणतेही अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा उत्तराधिकारी नसताना.

  • सर्वात गंभीर आरोप म्हणजे – 15 सप्टेंबर 2003 रोजी कलानिधी यांनी स्वतःच 12 लाख शेअर्स फक्त 10 रुपयांना घेतले, तेव्हा कंपनीचे शेअर्स बाजारात 2,500-3,000 रुपयांदरम्यान होते.

दयानिधी मारन काय मागणी करत आहेत?
  • कंपनीतील 2003 पूर्वीचे शेअर वाटप परत पूर्ववत करावं.

  • कलानिधी मारन यांची 60% हिस्सेदारी अमान्य ठरवावी.

  • मूळ कुटुंबातील शेअर हिस्सेदारी पुन्हा 50% केली जावी (सध्या ती फक्त 20% आहे).

  • कावेरी मारन यांना मिळणाऱ्या ₹87.5 कोटीच्या पगारावर प्रश्न उपस्थित करून, त्यांनी मिळवलेल्या सर्व लाभांची परतफेड करावी अशी मागणी केली आहे.

  • कलानिधी मारन किती श्रीमंत आहेत?

    कलानिधी मारन यांच्याकडे Sun TV Network मध्ये सध्या 75% हिस्सा आहे. यामुळे त्यांची संपत्ती सुमारे 3 अब्ज डॉलर (अंदाजे ₹25 हजार कोटी) इतकी झाली आहे. मात्र, हा वाद न्यायालयात गेल्यास, संपूर्ण Sun TV च्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं.

    Silver Price to Hit ₹2 Lakh: चांदीचा भाव 2 लाख रुपये होणार; कोणी केली भविष्यवाणी? गुंतवणूक करावी का? Sun TV का महत्त्वाचं आहे?

    Sun TV Network हे भारतातीलसर्वात मोठ्या मीडिया नेटवर्क्सपैकी एक आहे. यात टीव्ही चॅनेल्स, बातमी आणि मनोरंजन चॅनेल्स, रेडिओ स्टेशन आणि आयपीएलमधील Sunrisers Hyderabad ही क्रिकेट टीमही आहे.

    या कायदेशीर संघर्षामुळे शेअरधारक, गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढण्याची शक्यता आहे. आणि हा वाद अधिक खोल गेला, तर तो भारतातील सर्वात मोठ्या कौटुंबिक कॉर्पोरेट वादांपैकी एक ठरू शकतो.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.