नवी दिल्ली : आधार कार्ड धारकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. तुम्हाला घरबसल्या मोबाइल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख आणि नाव बदलण्याची कामं पूर्ण करु शकता. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार नोव्हेंबर 2025 आधार कार्डमधील माहिती तुम्ही अपडेट करु शकता. बायोमेट्रिक म्हणजेच फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन साठी आधार केंद्रावर जावं लागेल.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच एक नवी व्यवस्था लागू केली जाणार आहे. ज्यानुसार तुमचा डेटा दुसऱ्या सरकारी डेटाबेसमधून ऑटोमेटिक घेतला जाईल.पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा, जन्म प्रमाणपत्र आणि दहावीचे गण यासारखी माहिती उपलब्ध असेल. ऑनलाईन अपडेट द्वारे आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारिख आणि मोबाईल नंबर सारखी माहिती अपडेट होईल, तुम्हाला कागदपत्रं अपलोड करावं लागणार नाही. रिपोर्ट नुसार यूआयडीएआय वीज बिलाची माहिती देखील लिंक करण्याची तयारी करत आहे.
फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार यूआयडीएआयकडून नवं मोबाईल अॅप लाँछ केलं जाईळ. त्यामध्ये क्यूआर कोड बेस्ड इलेक्ट्रॉनिक आधार उपलब्ध होईल. त्यामुळं आधार कार्डची फोटो कॉपी किंवा प्रत द्यावी लागणार नाही. डिजीटल मास्क्ड आधार कार्ड तुम्ही शेअर करु शकता. यामुळं खोटी आधार कार्ड तयार करणाऱ्यांवर नियंत्रण येईल.
सध्या घरबसल्या आधार कार्डमध्ये पत्ता ऑनलाईन पद्धतीनं अपडेट करता येतो. मात्र, त्यासाठी आधार क्रमांकासोबत मोबाईल क्रमांक लिंक असणं आवश्यक असतं. जर, आधार कार्ड सोबत मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर माय आधार पोर्टलवर या सुविधेचा वापर करु शकणार नाही. सध्या तुम्हाला जन्मतारिख, नाव, मोबाईल नंबर यामध्ये बदल करायचे असल्यास आधार नोंदणी केंद्रावर जावं लागेल. यासाठी आधार कार्ड नोंदणी केंद्रावर अपॉइंटमेंट बुक करावी लागेल.
अनेक आधार कार्ड धारकांसाठी आधारमधील माहिती अपडेट करणं त्रासदायक होत आहे. आधार अपडेटसाठी अपॉईंटमेंट घ्या, रजा काढा, अर्ज भरा, कागदपत्रं जोडा यामुळं त्रासांपासून सुटका व्हावी म्हणून यूआयडीएआयकडून नवी सुविधा उपलब्द करुन दिली जाण्याची शक्यता आहे.
यूआयडीआयकडून आधार कार्ड अपडेट संदर्भातील नव्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर फक्त बोटांचे ठसे आणि आयरिस स्कॅनसाठी आधार नोंदणी केंद्रात जावं लागेल.
आधार कार्ड मधील पत्ता अपडेट करण्याची सुविधा 14 जून 2025 वरुन 14 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार क्रमांकासोबत लिंक असणं आवश्यक आहे.
आणखी वाचा