Crime: 'त्या' गोष्टीवरून पती संतापला; रागात पत्नीला केलं टकली, म्हणाला- जा बाहेर, आता दाखव सुंदरता तुझी...
esakal June 21, 2025 12:45 AM

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका पतीने आपल्या पत्नीसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. अवैध संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण केली आणि तिचे केस कापले. ज्यामुळे ती वेगळी दिसू लागली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे. महिलेने सांगितले की, तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. म्हणून त्याने माझे केस कापले.

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या अशोका गार्डन पोलीस स्टेशन परिसरातील सेठी नगरमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय विवाहित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचे लग्न नफीसशी झाले आहे. त्यांना दोन मुलेही आहेत. ती घरोघरी जाऊन साफसफाईचे काम करते. पण तिचा नवरा या गोष्टीने खूश नाही. तो दररोज यावरून तिच्याशी वाद घालायचा. तसेच तो तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. तो म्हणतो की, तू तुझे सौंदर्य दाखवण्यासाठी बाहेर जातेस.

Viral: शारिरीक संबंधावेळी पडदे उघडे राहिले; जोडप्याच्या खाजगी क्षणांचे लोकांनी व्हिडिओ बनवले, पंचतारांकित हॉटेलबाहेर रस्ता जाम

१७ जून रोजी सकाळी जेव्हा ती महिला कामावर जाऊ लागली तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला पुन्हा कामावर जाण्यास मनाई केली. महिलेने विरोधकेला तेव्हा पतीने तिला शिवीगाळ केली. मारहाण केली आणि कात्रीने तिचे केस कापले. यानंतर तो म्हणाला, जा आणि तुझे सौंदर्य दाखव. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

पोलीस स्टेशनचे प्रभारी अनुराग लाल म्हणतात की, तपासात असे समोर आले आहे की आरोपी पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि त्यामुळे घरात दररोज वाद होत असत. आरोपी फरार आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. घटनेपासून पीडिता खूप घाबरली आहे. ती तिच्या पतीवर कारवाईची मागणी करत आहे. महिलेला भीती आहे की तिचा पती तिला पुन्हा मारहाण करेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.