कारसाठी माहेरवरुन 10 लाख घेऊन ये, पैशासाठी पोलिसानेच केला पत्नीचा छळ, बीडमध्ये गुन्हा दाखल
Marathi June 20, 2025 09:24 PM

बीड क्राइम न्यूज: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यानेच 10 लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

2021 पासून रेणुका यांचा शारीरिक आणि मानसिक छळ

पोलीस कर्मचाऱ्याकडूनच 10 लाखांसाठी पत्नीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणुका विनोद कुटे यांनी याबाबत तक्रार दिली होती. त्यांचे पती विनोद कुटे बीड जिल्हा पोलीस दलात कार्यरत असून सध्या ते पोलीस मुख्यालयात पदस्थापनेवर आहेत. 2021 पासून रेणुका यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार देण्यात आली आहे.

चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून 10 लाख रुपये घेऊन ये

चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून 10 लाख रुपये घेऊन ये असं म्हणत रेणुका यांचा छळ मागील काही वर्षांपासून केला जात आहे. शिवीगाळ करुन मारहाण केली त्याचबरोबर धमकी देखील दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याप्रकरणी विनोद कुटे, सीता कुटे, रोहिणी गाडे आणि गोविंद गाडे या चार जणां विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून पोलिसानेच पत्नीचा छळ केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणुका विनोद कुटे यांनी याबाबत तक्रार दिली होती.

पैशासाठी छळ आणि मारहाण

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात 23 वर्षीय विवाहित वैष्णवी हगवणेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. वैष्णवी ही अजित पवार गटाचे तत्कालीन तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेची सून होती. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाकडून हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केला जात होता. माहेरून पैसे आणण्यासाठी तिला मारहाण देखील केली जात होती. सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली होती. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण ताजं असताना आता बीडमधून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. पोलिसानेच पैशांसाठी पत्नीचा छळ केल्याची घटना समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.