टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शुबमन गिल याने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात इंग्लंड विरुद्ध इतिहास घडवला आहे. शुबमनने हेडिंग्ले लीड्समध्ये आयोजित पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्रात धमाकेदार शतक झळकावलं आहे. शुबमन या मालिकेत शतक करणारा टीम इंडियाचा आणि एकूण दुसरा फलंदाज ठरला. शुबमनने यासह विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला आहे.
शुबमनने 75 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत शतक पूर्ण केलं. शुबमनने 57.75 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 102 धावा केल्या. शुबमनने या शतकी खेळीत 14 चौकार लगावले. शुबमनचं हे कसोटी कारकीर्दीतील सहावं तर सेना देशातील पहिलं शतक ठरलं. शुबमनने यासह टीम इंडिया माजी फलंदाज विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला. शुबमनने विराटचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासातील 5 शतकांचा विक्रम मोडीत काढला.