Kids Health:आजारी मुलं जेवायचा कंटाळा करतात?
Marathi June 21, 2025 06:24 AM
प्रौंढाच्या तुलनेत लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने व्हायरल इन्फेक्शनमुळे ते लवकर आजारी पडतात. आता तर पावसाचे दिवस सुरू असल्याने डेंग्यु-मलेरियासारखे अनेक आजार डोके वर काढतात. त्यामुळे या दिवसात कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेली लहान मुले विविध व्हायरल इन्फेक्शन्सला लवकर बळी पडतात. अशावेळी अनेकदा औषधांच्या परिणामामुळे किंवा शरीरात असलेल्या जंतूमुळे अन्न खावेसे वाटत नाही. कित्येकजणांना जेवताना जिभेला चव नसल्याने उलटीसारखे वाटते. दुसरीकडे मुलांच्या शरीरात पौष्टिक पदार्थ जाणे देखील गरजेचे असते. अशावेळी पालकांना मुलांना समजावताना नाकीनऊ येतात. जर तुमचेही मूल खायला नाही म्हणत असेल तर जाणून घेऊयात यावरील सोप्या टिप्स
टिपा –
- मुलं आजारी पडल्यावर त्यांना पचायला सोपे आणि हलके पदार्थ द्यावेत.
- लहान मुलांना सकस आहार द्यावा.

- मुलांना फळे, भाज्या, कडधान्ये खायला द्यावीत. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषकतत्वे असतात, जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
- पचायला जड पदार्थ देऊ नयेत. यामुळे लहान मुलांची तब्येत आणखीनच बिघडू शकते.
- जर मुलं आजारी असूनही खायला मागत असेल तर आवर्जून द्या. यामुळे त्याची भूक भागली जात नाही.
- मुलांना ज्यूस देऊन हायड्रेट ठेवता येईल.

- मुलाला अन्न गिळताना त्रास होत असेल तर त्याला मॅश केलेले अन्न द्यावे.
- आजारातून लवकर बरे होण्यासाठी मुलाला खाण्यासाठी प्रोत्साहित करा.

- दोन जेवणामध्ये खिचडी, ज्यूस, सूप किंवा ओट्स सारखे द्रव द्यावे. या पदार्थांनी मुलांना ऊर्जा मिळेल.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना जबरदस्ती खायला देऊ नये.
हेही पाहा –