पिंपरी, ता. २० ः सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्स केबल्स यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त ‘साथ चल’ उपक्रम शुक्रवारी राबविण्यात आला. ‘वारी विठुरायाची, आई-वडिलांच्या सेवेची’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. सर्वांनी मोरवाडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते एचए कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत ‘साथ चल’ दिंडीत चालून आई-वडिलांच्या सेवेची शपथ घेतली.
‘साथ चल’ उपक्रमात सहभाग
वुई टुगेदर फाउंडेशन
अध्यक्ष मधुकर बच्चे, राजू कोरे, जगदीश पाटील, रोहिणी बच्चे, गीता कोरे, अपर्णा राजहंस, श्रावणी बच्चे, सारिका जोशी, भारती मोकाशी, स्मिता मोघे, आसावरी बच्चे, अनिल शिंदे, शंकर कुलकर्णी, अर्चना बच्चे, गणेश बच्चे, पोपट बच्चे, सुप्रिया सवाई, तनया सुतार, पोपट बच्चे, अक्षय गारगोटे, रंजना गारगोटे, सुनीता पाटील, वर्षा गावडे, वर्षा भामरे, भाग्यश्री वडतकर.
मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज
मराठवाडा मित्र मंडळाच्या थेरगाव येथील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. प्रमोद सकपाळ, प्रा. मुकेश रत्नपारखी, प्रसाद कदम, सचिन जगदाळे, मनोज आस्वार, शैलेंद्र साळवणकर, अभिजीत करंजे, विलास पाटील, जितेंद्र पाटील, प्रतीक माने, आशिष गायकवाड, सतीश जाधव, भाऊराव माने, दिलीप गार्डे.
मोरवाडी ज्येष्ठ नागरिक संघ
उल्हास झिरपे, मधुरा झिरपे, पंडित वाणी, लता वाणी.
गुरूदत्त सेवा मंडळ
अजमेरा कॉलनीतील गुरूदत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष अर्जुन ठाकरे, मंदाकिनी ठाकरे, दिलीप पालेकर, एकनाथ दांदळे, तुळशराम दाते, दीपक राणे, ज्योतिबा दरेकर.
उद्योग, व्यवसाय, सोसायट्या, संस्था
फिनोलेक्स केबल्सचे अध्यक्ष अमित माथूर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी. सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचे कर्मचारी. बेंकीझ कंपनीचे उत्पादन विभाग सहायक सरव्यवस्थापक संभाजी पाटील, पिंपरीतील कोहिनूर शॅंग्रीला सोसायटी, मोरया राज पार्क सोसायटी चिंचवड, वुई टुगेदर फाउंडेशन, सुंदर बाग सोसायटी चिंचवड
एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक
चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास माळी, प्रिया माळी, गोपाळ कुलकर्णी, हिंदुराव मोहिते, उदय तवकर, गोपाळ कुलकर्णी, रघुनाथ लोखंडे, विजय भोंडोकर, अशोक ब्राह्मणगावकर, अशोकराव मोरे.
कामगार संघटना
कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, घरेलू कामगार विभाग या संघटनांचे पदाधिकारी व सदस्य. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, बाबा मारणे, राजेश माने, सुनील भोसले, सलीम डांगे, सुनील मोरे, निरंजन लोखंडे, महादेव गायकवाड.
शैक्षणिक संस्था
औद्योगिक शिक्षण मंडळाचे एएसएम कॉलेज पिंपरी, रसिकलाल एम. धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस ॲँड रिसर्च चिंचवड, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञान प्रसाद विद्यापीठ, स्कूल ऑफ फार्मसी अँड रिसर्च पिंपरी, इव्होनेक्स्ट हेल्थकेअर व डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद व रिसर्च सेंटर पिंपरी, एसएनबीपी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज
पथनाट्याद्वारे जनजागृती
‘सकाळ’च्या ‘साथ चल’ उपक्रमात सकाळ ‘यिन’चे आणि आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक व एचए कॉलनीच्या प्रवेशद्वारानजीक पथनाट्य सादर केले. त्यातून त्यांनी आई-वडिलांची सेवा करण्याबाबत जनजागृती केली. या माध्यमातून व्यसनाधीन मुलांना सांभाळताना आई-वडिलांना होणारा त्रास, मोबाईलचा
अतिरेकी वापर, आई-वडिलांकडे होणारे युवकांचे दुर्लक्ष यावर प्रहार केला. पथनाट्यात सहभागी विद्यार्थ्यांमध्ये युसूफ शेख, प्रतीक भांगरे, वैभव कदम, वेदिका पाटील, सोनाली पाचपुते, अस्मिता डोळस, अपेक्षा शिवशरण यांचा समावेश होता. आई-वडिलांची काळजी घेण्याची आणि त्यांची सेवा करण्याचा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला.
आषाढी वारीच्या माध्यमातून सकाळ माध्यम समूहाचा ‘साथ चल’ हा प्रबोधनात्मक उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम वयात आई-वडिलांच्या सेवेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात हे विद्यार्थी आई-वडिलांची सेवा करतील, असा संकल्प करण्यासाठी हे अभियान अतिशय प्रेरणादायी व परिणामकारक ठरेल.
- हनुमंत मारकड, प्राचार्य, श्री गुरु गणेश विद्या मंदिर माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालय, निगडी