Electric Shock : कुलरचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू
esakal June 20, 2025 10:45 PM

नांदुरा : येथून जवळच असलेल्या वडाळी येथील गौरव चेतन वक्टे या चार वर्षाच्या चिमुकल्यास घरामध्ये खेळत असताना कुलरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ता.१८ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता घडली.

वडाळी येथील चेतन नारायण वक्टे हे शेतामध्ये कामानिमित्त गेले होते, तर गौरव ची आई घर काम करत होती.

यावेळी चिमुकला गौरव घरामध्ये खेळताना नकळत कुलर जवळ गेला असता कुलर मध्ये करंट आल्याने त्याला जबर धक्का लागून तो खेचला गेला. यावेळी तात्काळ त्याला नांदुरा येथे शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.

Sharad Pawar : एआयमध्ये बारामतीचे नाव जगाच्या नकाशावर जाणार- शरद पवार

त्याच्यावर रात्री १० वाजता वडाळी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. नेहमी सर्वांच्या नजरेसमोर असणारा, कुणालाही दिसताक्षणी आपुलकीने ओढ लावणारा, सदा हसतमुख चिमुकला गौरव असा चटकन पाखरासारखा निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.