पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, आटीआऱ फाईल करताना फायदा होणार, NPCI कडून मोठी अपडेट
Marathi June 21, 2025 02:24 AM

एनपीसीआय: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं इन्कम टॅक्स ई फायलिंग वेबसाईटवर पॅन आणि बँक अकाऊंट वेरिफिकेशन प्रक्रिया सोपी करण्यासाठी एक सुविधा सुरु केली आहे. याचा हेतू करदात्यांना आणि सरकारी विभागांना इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची प्रक्रिया वेगवान आणि सोपी करणं हा आहे.

एनपीसीआयनं  एक परिपत्रक जारी करुन या अॅप्लिकेशन प्रोग्रामिंक इंटरफेस संदर्भात माहिती दिली आहे. ज्यामुळं पॅन कार्ड माहिती, बँक अकाऊंट स्टेटस आणि खातेधारक यांच्या रिअल टाइम वेरिफिकेशनसाठी डिझाइन केलं आहे. या इंटरफेसच्या मदतीनं डेटा वेरिफिकेशन थेट बँकांच्या कोर बँकिंग सिस्टीमद्वारे होईल.

बँक पडताळणी गतिमान होणार

परिपत्रकातील माहितीनुसार या इंटरफेसची निर्मिती प्रामुख्यानं सरकारी विभागांसाठी करण्यात आली आहे. याच्या मदतीनं आपल्या बँकांच्या कोअर बँकिंग सिस्टीम मधून खातेदारांचे पॅन, अकाऊंटची स्थिती, खातेदारांचं नाव याची पडताळणी होईल.

सॉफ्टवेअर ब्रिज म्हणून एपीआय म्हणून काम करेल

एपीआय एक सॉफ्टवेअर ब्रिज आहे, जो दोन सिस्टीमला कम्युनिकेट करणे आणि डेटा शेअर करण्याची परवानगी देतं. या इंटरफेसच्या मदतीनं इन्कम टॅक्स पोर्टलवर सरकारी प्लॅटफॉर्म्सला बँकांना कोअर सिस्टीमचया सुरक्षित पद्धतीनं आणि वेगवान पडताळणीची सुविधा मिळेल. NPCI नं या सदस्य बँकांना या सुविधा प्राधान्यानं सक्रीय करण्याचा आग्रह केला. कारण ही सेवा भारत सरकारकडून प्रदान केली जाणार आहे.

करदात्यांना फायदा मिळणार

या प्रणालीचा करदात्यांना फायदा होणार आहे. टॅक्स रिटर्न फाइल करताना पॅन बँक अकाऊंट लिंक करण्याची प्रक्रिया वेगवान होइल. वेरिफिकेशन दरम्यान मॅन्युअल त्रुटी कमी होतील. टॅक्स रिलेटेड पेमेंट मध्ये गती येईल. यासह करदात्याचं डेटा वेरिफिकेशन आणि अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह असेल. साधारणपणे टॅक्स रिर्टन फाइल केल्यानंतर पडताळणी स्टेटस ई फायलिंग अकाऊंट 10 ते 12  वर्किंग डेमध्ये अपडेट होईल.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.