पंचांग -
शनिवार : ज्येष्ठ कृष्ण १०/११, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ५.४३, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय उ. रात्री २.२३, चंद्रास्त दुपारी ३, योगिनी (स्मार्त) एकादशी, दक्षिणायनारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ ३१ शके १९४७.
दिनविशेष -
२००२ - भारताने बालासोर येथून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चंडीपूर येथे ‘नाग’ या रणगाडाभेदी दोन क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली.
२००७ - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आणि ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे (सुपरसॉनिक) ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र लष्करात दाखल.
२००९ - साईना नेहवालने चुरशीच्या लढतीत प्रतिष्ठेच्या इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.