सोन्याचे दर: सोन्या चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार होत आहेत. एकीकडे भूराजकीय तणाव, जागतिक अनिश्चितता, व्यापार युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता अशा अनेक कारणांमुळे सोन्या चांदीचे दर कधी उसळतात तर कधी गडगडतात. त्यामुळे सोने खरेदीदार संभ्रमावस्थेत आहेत. इज्राइल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे आणि बेंच मार्क व्याजदरावर अमेरिकेच्या फेडरल रिजर्वच्या आक्रमक भूमिकेनंतर देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमती घसरल्या आहेत.
बुलियन्स ‘च्या ताज्या सोनेदरानुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी आता खरेदीदारांना 99 हजार 120 रुपये खर्च करावे लागतील .तर 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर हा 90,860 रुपये एवढा आहे .वर्षभरापूर्वी, सोन्याचा 24 कॅरेट साठी 10 ग्रॅममागे 71 हजार 620 रुपये दर होता .महिनाभरापूर्वी सोनं 95 हजार 870 रुपयांवर पोहोचलं .तर आज दहा ग्रॅम सोन्यासाठी 99,120 द्यावे लागत आहेत .
इंडियन बुलियन असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, 19 जून रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 99300 रुपये प्रति 10 ग्रॅम होती .तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 25 रुपये प्रति 10 ग्रॅम होती . आज ही किंमत काहीशी कमी झाली आहे . दरम्यान गेल्या तीन आठवड्यांपासून चांदीचे भावही किलोमागे एक लाख रुपयांवर राहिले आहेत .बाजारातील अस्थिरता भूराजकीय चिंता या सगळ्यात तज्ञांचा विश्वास आहे की सोने आणि चांदी ही अजूनही सुरक्षित गुंतवणूक आहे .
अलीकडच्या काळात सोन्याच्या किमती या सातत्याने तेजीत राहिले आहेत .गेल्या वीस वर्षांचा ट्रेंड पाहिला तर 2005 मध्ये 7638 रुपयांवरून 2025 मध्ये जून पर्यंत सोन्याच्या किमती जवळजवळ 1200 टक्क्यांनी वाढल्या आहेत . एक्सेस सिक्युरिटीच्या अहवालानुसार,पिवळ्या धातूचा हा सहा महिन्यांचा विजयी टप्पा आहे .ज्यात मी 2002मध्ये शेवटचं ऐतिहासिक यश होतं .त्यानंतर जून 2025 मध्ये सोन्याच्या किमती 3 टक्क्यांनी वाढल्या .जर या महिन्यात सोन्याच्या किमती सकारात्मक राहिल्या तर सलग सहा महिन्यात सोन्याच्या किमतीत होणारी ही वाढ असेल .चीननंतर जगातील सोन्याची आयात करणारा दुसरा मोठा ग्राहक असलेला भारत सोन्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.
जागतिक बाजारात सोन्याची किंमत अमेरिकन डॉलरमध्ये ठरते, त्यामुळे डॉलरच्या विनिमय दरात बदल झाला, तर भारतात सोन्याच्या किमतीवर त्याचा थेट परिणाम होतो. यासोबतच, भारतात आयात शुल्क आणि कर रचना जास्त असल्यामुळे सोनं आणखी महाग पडतं. सोनं पारंपारिकपणे महागाईपासून बचावासाठी घेतलं जातं.
हेही वाचा:
HDB IPO: एचबीडी फायनान्शियलचा IPO 25 जूनला; जुन्या गुंतवणूकदारांना बसणार मोठा झटका! काय आहेत कारणं?
आणखी वाचा