3000 रुपयांची एसआयपी अन्  3 लाख रुपयांची लम्पसम गुंतवणूक,कोणती गुंतवणूक फायदेशीर?
Marathi July 12, 2025 06:25 PM

मुंबई : गुंतवणुकीच्या लोकप्रिय प्रकारांपैकी चर्चेत असलेला प्रकार म्हणजे एसआयपी होय. एसआयपी करावी की लम्पसम गुंतवणूक करावी असा प्रश्न अनेकांसमोर असतो. भविष्यातील आर्थिक गरजांच्या खर्चाचं नियोजन करण्यासाठी एसआयपीद्वारे नियमित गुंतवणूक करत असतात. एसआयपीद्वारे गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांकडील शिस्त आणि नियमितता पाहायला मिळते.Lumpsum गुंतवणुकीत एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवावी लागते. दोन्ही पैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरेल हे जाणून घेणं गरजेचं आहे.

एसआयपीद्वारे दरमहा छोट्या रकमेची गुंतवणूक करावी किंवा लम्पसम म्हणजेच एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवावी याबाबत संभ्रम असतो.  कोणता पर्याय फायदेशीर ठरेल हे एका उदाहरणातून जाणून घेता येईल.समजा एखाद्या गुंतवणूकदारानं दरमहा 3 हजार रुपयांची गुंतवणूक सुरु केली किंवा 3 लाख रुपयांची लम्पसम गुंतवणूक 30 वर्षांसाठी केली असता 30 वर्षानंतर 12 टक्के सीएजीआरनुसार  कशात अधिक फायदा होईल हे तपासलं पाहिजे.

एसआयपीद्वारे दरमहा गुंतवणूक करणं शिस्तबद्ध गुंतवणूक समजली जाते. यामध्ये जोखीम कमी असते. तर, लम्पसम गुंतवणूक करताना मोठी रक्कम गुंतवावी लागते, यामध्ये जोखीम अधिक असते.जर एखाद्या गुंतवणूकदारानं दरमहा 3000 रुपयांची एसआयपी 30 वर्ष सुरु ठेवल्यास एकूण गुंतवणूक 10,80,000 लाख रुपये असेल. 12 टक्के सीएजीआर नुसार मॅच्युरिटीनंतर एकूण रक्कम 92,42,920 रुपये असेल. तर 3 लाख रुपयांची लम्पसम गुंतवणूक 30 वर्षांसाठी  केल्यास  12 टक्के सीएजीआरनुसार एकूण रक्कम 897977 रुपये रक्कम असेल.

जर तुम्ही 30 वर्षासाठी दरमहा 3 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास एकूण गुंतवणूक 10 लाख 80 हजार रुपये असेल. 12 टक्के सीएजीआर नुसार 30 वर्षानंतर परतावा 92 लाख इतका असेल.  तर, 3 लाख रुपयांच्या Lumpsum ची गुंतवणूक 30 वर्षानंतर 12 टक्के सीएजीआरनुार 89 लाख इतकी रक्कम होईल. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केल्यास एसआयपी फायदेशीर ठरते.

जर तुम्ही विना जोखीम दीर्घकालीन गुंतवणूक करुन मोठी रक्कम उभारण्याचा प्रयत्न करत असाल तर एसआयपी हा चांगला पर्याय आहे. एसआयपी तुम्ही 500 रुपयांपासून सुरु करु शकतात. छोट्या गुंतवणुकीद्वारे सुरुवात करुन मोठा फंड उभारु शकतात. एसआयपीवर कम्पाऊंडिंगचा चागंला फायदा मिळू शकतो.तुमच्याकडे पीएफ, बोनस, भत्ता याद्वारे मोठी रक्कम मिळाली असल्यास त्याची लम्पसममध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. शेअर बाजारात घसरण झालेली असेल आणि पुन्हा त्यात वाढ होईल, असं तुम्हाला वाटत असल्यास लम्पसम गुंतवणुकीचा विचार करु शकता.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.