भारत आणि इंग्लंड तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरु आहे. भारताने या सामन्यात बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. इंग्लंडकडे अजूनही आघाडी आहे. मात्र भारतीय फलंदाज खेळत असल्याने हे अंतर कमी होत आहे. असं असताना दुसरीकडे, भारत आणि इंग्लंड अंडर 19 संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा या वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीकडे खिळल्या होत्या. कारण त्याने वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरश: झोडून काढलं होतं. मात्र कसोटी सामन्यात त्याची बॅट काही चालली नाही. पहिला कसोटी सामना बकिंघममध्ये खेळला जात आहे. वैभव सूर्यवंशीने या सामन्यातही आक्रमक सुरुवात केली. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर त्याने आणखी दोन चौकार मारले. त्याने 13 चेंडूत 14 धावा केल्या आणि एलेक्स ग्रीनचा शिकार ठरला. वैभव सूर्यवंशीच्या कसोटी कारकिर्दीतील हा तिसरा सामना आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने खेळला आहे. त्या दोन सामन्यांमध्ये त्याने 108 धावा केल्या होत्या, यात एका शतकाचा असून युवा कसोटीत भारतीयाने झळकावलेल्या सर्वात जलद शतकाचा हा विक्रम आहे.
वैभव सूर्यवंशी फेल गेला असला तरी कर्णधार आयुष म्हात्रे मात्र या सामन्यात चमकला. त्याने दुसऱ्या विकेटसाठी विहान मल्होत्रासोबत 173 धावांची भागीदारी केली.त्याने 115 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकार मारत 102 धावा केल्या. मात्र आर्ची वॉनच्या चेंडूवर बाद होत तंबूत परतला. विहान मल्होत्रानेही 99 चेंडूत 67 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताच्या 200 पार धावसंख्या झाली आहे. भारताला हा सामना जिंकायचा असेल तर पहिल्या डावात किमान 400 धावांची आवश्यकता आहे. कारण दुसऱ्या डावात भारताला आणखी बळ मिळू शकते.
इंग्लंड अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): जेडन डेन्ली, आर्ची वॉन, हमजा शेख (कर्णधार), रॉकी फ्लिंटॉफ, बेन मेयेस, थॉमस र्यू (यष्टीरक्षक), एकांश सिंग, राल्फी अल्बर्ट, जॅक होम, जेम्स मिंटो, एलेक्स ग्रीन.
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), आरएस अंबरिश, मोहम्मद इनान, दीपेश देवेंद्रन, हेनिल पटेल, अनमोलजीत सिंग