धाराशिव: तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर जुलैमधील सिंहासन पूजेसाठी ऑनलाइन नोंदणीला शनिवारी (ता. २१) सकाळी दहापासून सुरवात होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानच्या व्यवस्थापकांतर्फे देण्यात आली.
भाविकांनी सिंहासन पूजेसाठी http://shrituljabhavanitempletrust.org या संकेतस्थळावरील ‘सिंहासन पूजा पास बुकिंग’ या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर https://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर प्रवेश करून आपली सिंहासन पूजेची नोंदणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
नोंदणी २६ जूनपर्यंत (सकाळी दहा) करता येईल. त्यानंतर ऑनलाइन सोडत पद्धतीने भाविकांची निवड होईल. भाविकांना शुल्कासाठी २७ जूनला सकाळी साडेदहाला एसएमएस पाठविण्यात येतील. त्यानंतर भाविकांना ऑनलाइन शुल्क २८ जूनपर्यंत सकाळी दहापर्यंत भरता येईल.
सिंहासन पूजेसाठी विशिष्ट संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाइन सोडत पद्धतीने द्वितीय सोडत काढली जाईल. भाविकांना शुल्कासाठी २८ जूनला एसएमएस पाठविण्यात येतील, २९ जूनला ऑनलाइन शुल्क भरता येईल.
Ashadhi Wari 2025 : गंगागिरी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थानप्रथम व द्वितीय फेरीसाठी विशिष्ट संख्या पूर्ण न झाल्यास तृतीय सोडत काढून शुल्कासाठी २९ जूनला एमएमएस पाठविण्यात येतील. दुसऱ्या दिवशी ऑनलाइन शुल्क भरता येईल. जुलैतील सिंहासन पूजा नोंदणी केलेल्यांची अंतिम यादी ३० जूनला सायंकाळी पाचला प्रसिद्ध करण्यात येईल, असे संस्थानातर्फे सांगण्यात आले.