Ashadhi Wari 2025 : गंगागिरी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
esakal June 21, 2025 12:45 PM

महालगाव : श्रीक्षेत्र सराला बेट ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास शुक्रवारी सराला बेट येथे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सद्गुरू गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायणगिरीजी यांचे पाद्यपूजन करून मंदिर प्रदक्षिणा करत प्रारंभ करण्यात आला.

महाराष्ट्रातील गंगागिरी महाराज फडावरील शिस्तप्रिय म्हणून ओळख असणाऱ्या दिंडीत अडीच ते तीन हजार वारकरी सहभागी झाले आहेत. यावेळी ‘संकल्प ते सिद्धी तक’, ‘एक पेड माँ के नाम’ या वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रमांतर्गत श्री क्षेत्र सराला बेट ते लाडगाव या सात किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावण्यास सुरवात झाली.

Ashadhi Wari 2025 : परळीमध्ये आतषबाजी, पुष्पवृष्टी; गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, डॉ. दिनेश परदेशी, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे, अविनाश गंलाडे, संतोष जाधव, बाबासाहेब चिडे, बबनराव मुठे, विजय पवार, नारायण कवडे, पंकज ठोंबरे, दत्तू खपके, राम दरबार आश्रमाचे हरिशरण गिरी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदीपान महाराज, योगानंद महाराज विश्वनाथ गिरी, विक्रम महाराज, डॉ. कोते, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत दिंडीचे प्रस्थान झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.