Prajakta-Amruta : हर हर महादेव! प्राजक्ता माळी अन् अमृता खानविलकरनं घेतलं केदारनाथचं दर्शन, पाहा VIDEO
Saam TV June 21, 2025 01:45 PM

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या अभिनय आणि सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. मात्र आता प्राजक्ता माळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ता माळीने 'श्री केदारनाथ' चे (Shri Kedarnath Jyotirlinga Temple) दर्शन घेतले आहे. याचे सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

उत्तराखंडमधील श्री केदारनाथमंदिर 12 ज्योतिर्लिंग यात्रेतील 11 वे ज्योतिर्लिंग आहे. या यात्रेत प्राजक्ता माळी एकटी नसून तिच्यासोबत तिचे कुटुंब आणि मराठमोळी अभिनेत्री जिने आपल्या नृत्याने चाहत्यांना वेड लावले आहे अशी अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar) देखील होती. श्री केदारनाथ मंदिरच्या परिसरातील खूप छान फोटो तिने शेअर केले आहे. ज्यात कुटुंब आणि अमृता खानविलकर दिसत आहे. या फोटोंना प्राजक्ता माळीने खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "श्री केदारनाथ...रुद्रप्रयाग- उत्तराखंड...अशाप्रकारे १२ ज्योतिर्लिंग यात्रेतील ११ व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन निर्विघ्नपणे पार पडले. यावेळी कुटुंबासमवेत अमृता देखील यात्रेत सहभागी झाली, याचा अत्यानंद आहे."

प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर केदारनाथला एका खास लूकमध्ये दिसले. दोघींनीही सुंदर साडी नेसली होती. प्राजक्ता माळीने मोती रंगाची साडी, मोकळे केस आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असा लूक केला होता. तर अमृताने पांढऱ्या रंगाची साडी, नाकात नथ, पारंपरिक दागिने आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ घालून लूक पूर्ण केला होता. दोघीसुद्धा खूपच सुंदर दिसत होत्या.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील 'श्री केदारनाथ' दर्शनाचा खूप छान व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला तिने सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. तिने या व्हिडीओमधून 'श्री केदारनाथ' दर्शनाची एक छोटी झलक दाखवली आहे.

Subodh Bhave : मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिकेत; संत तुकाराम महाराज यांचा रोल करणार, पहिला PHOTO समोर
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.