IND vs ENG 1st Test 2025 Rishabh Pant batting highlights : इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीचा पहिला दिवस भारताने गाजवला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील पहिल्याच कसोटीत टीम इंडियाने 'यशस्वी' 'शुभ'आरंभ केला. यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल यांनी ९१ धावांची भागीदारी करताना इंग्लंडमधील २०१२नंतरची सर्वोत्तम सलामीच्या धावसंख्येची नोंद केली. त्यानंतर यशस्वी व शुभमन यांच्या शतकांनी मॅच गाजवली, त्यात रिषभ पंतनेही अर्धशतक झळकावताना पाच मोठे विक्रम नोंदवले.
यशस्वी आणि केएल राहुल यांनी २४.५ षटकांत संयमी खेळ करताना ९१ धावांची सलामी दिली. पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपूर्वी इंग्लंडला दोन धक्के देता आले. राहुल ७८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ४२ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पदार्पणवीर साई सुदर्शन भोपळा न फोडताच बाद झाला. पण, यशस्वी व शुभमन मैदानावर उभे राहिले आणि त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. यशस्वीच्या उजव्या हाताची नस त्रास देत होती, परंतु तो मैदानावर उभा राहिला आणइ १५९ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या.
MPL 2025: धडामधुडूम ! फलंदाज एकमेकांवर जोरात आदळले, मैदानावर पडले; तरीही Run Out नाही झाले, Funny Viral Videoत्यानंतर शुभमन व रिषभ पंत यांनी दिवसअखेपर्यंत मोर्चा सांभाळला. शुभमने १७५ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारासह १२७ धावांची नाबाद खेळी केली, तर रिषभने १०२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह नाबाद ६५ धावा केल्या भारताने दिवसअखेर ३ बाद ३५९ धावा केल्या आहेत.
रिषभ पंतचे पाच विक्रम... WTC स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ( भारतीय)५८ - रिषभ पंत ( ६१ डाव)
५६ - रोहित शर्मा ( ६९ डाव)
४० - यशस्वी जैस्वाल ( ३७ डाव)
३२ - शुभमन गिल ( ६० डाव)
२९ - रवींद्र जडेजा ( ५८ डाव )
SENA म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारे यष्टिरक्षक
१७४७ - रिषभ पंत ( ४९ डाव)
१७३१ - महेंद्रसिंग धोनी ( ६० डाव)
१०९९ - फारूख इंजिनियर ( ३३ डाव)
८५० - मोहम्मद रिझवान ( २० डाव)
८३१ - दिनेश चंडिमल ( २६ डाव)
७८५ - कामरान अकमल ( ४२ डाव)
६३ डाव - अॅडम गिलख्रिस्ट
७६ डाव - रिषभ पंत ( वेगवान ३००० धावा करणारा आशियाई यष्टिरक्षक)
७८ डाव- अँडी फ्लॉवर
७८ डाव - कुमार संगकारा
महेंद्रसिंग धोनीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा करणारा तो पहिलाच भारतीय यष्टिरक्षक फलंदाज आहे.
आशियाई यष्टिरक्षकांच्या कसोटीतील धावा४८७६ धावा - महेंद्रसिंग धोनी
३५१५ धावा - मुश्फिकर रहीम
३११७ धावा - कुमार संगकारा
३०३१ धावा - सर्फराज अहमद
३००० धावा - रिषभ पंत