वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील डाग पिंपळगाव येथे विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
ईशा सचिन पवार असे मृत तरुणीचे नाव आहे. ईशाला राहत्या घरी विजेचा धक्का लागल्याने तिला ग्रामस्थांनी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दुपारी बाराच्या सुमारास दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Dharashiv News : भिंतीखाली दबून मजूर ठार;एक जखमी, धाराशिव जिल्ह्यातील घटनामाहिती मिळताच वीरगाव पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वीरगाव पोलिसांत घटनेची नोंद घेण्यात आली आहे.