Kolhapur Silver City Hupari : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल(ता.२०) पहाटे चारच्या सुमारास येथील महावीरनगरमधील निधी बँक, शेअर बाजार तसेच चांदी व्यवसायाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीच्या कार्यालयावर छापा टाकून चौकशी केली. सुमारे पंधरा तास चौकशी सुरू होती.
चौकशीदरम्यान कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त होता. चौकशीच्या ठिकाणी कोणालाही फिरकू दिले जात नव्हते. अत्यंत गोपनीय पद्धतीने चौकशी झाली. कारवाईत काय निष्पन्न झाले याबाबतचा अधिकृत तपशील मिळू शकलेला नाही. ईडीच्या पथकात सहा अधिकाऱ्यांचा सहभाग होता. या अधिकाऱ्यांनी पहाटे चारलाच निधी बँक कार्यालयाचा ताबा घेतला.
Kolhapur News : विद्यार्थी कमी असलेल्या पदव्युत्तर केंद्रांना कुलूप; विद्यापीठाच्या विद्या परिषदेचा निर्णयबँकिंग, शेअर बाजार तसेच अन्य व्यवहाराच्या कागदपत्रांची तपासणी केल्याचे समजते. रात्री सातला चौकशी पूर्ण करून अधिकारी बाहेर पडले. छापा पडलेली व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे. शहरात याआधी आयकर विभागाचे छापे पडल्याच्या घटना घडल्या. पण, ईडीसारख्या चौकशी यंत्रणेचा छापा प्रथमच पडल्याने त्याची शहर परिसरात जोरदार चर्चा सुरू होती.