पुणे, ता. २१ : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (ता.22) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे भवानी पेठ, नाना पेठेसह सोलापूर मार्ग रविवारी वाहतुकीसाठी बंद असणार आहे. रविवारी पहाटेपासून वाहतुकीत बदल केला जाणार आहे, त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी सोहळ्याचे विठोबा मंदिर येथून प्रस्थान होईल, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पालखी नाना पेठेतील श्री निवंडुगा विठोबा मंदिर येथून रविवारी सकाळी प्रस्थान होणार आहे. हा पालखी सोहळा नाना पेठ व भवानी पेठेतून सोलापूर मार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर येथील गाडीतळ येथून दिवेघाट मार्गे सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोर येथे मुक्कामी असणार आहे. दोन्ही पालखी सोहळ्यांना वाहतुकीची अडचण येऊ नये, यादृष्टीने रविवारी पहाटेपासून पालखी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
Ashadhi Wari 2025 : राम और रहीम एक हैं! यासिन अत्तार यांचा वरीतून संदेश... आचारी ते पखवाज वादकापर्यंतचा प्रवासपालखी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते- संत कबीर चौक ते बेलबाग चौक
- संत कबीर चौक ते रामोशी गेट चौक
- ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक) ते रामोशी गेट चौक
- गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौक
- मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान
- बिशप स्कूल ते मम्मादेवी चौक
- ट्रायलक हॉटेल ते महात्मा गांधी रस्ता ते रामोशी गेट चौक,
- भैरोबानाला चौक ते मम्मादेवी चौक
- जांभूळकर चौक ते फातिमानगर चौक
- बी. टी. कवडे रस्ता चौक, काळूबाई मंदिर चौक, रामटेकडी,
- मगरपट्टा चौक, हडपसर गाव वेस (वाहतूक बंद मध्यरात्री दोन ते दुपारी दोन)
- सिरम चौक ते सोलापूर रस्ता
-१५ नंबर फाटा ते सोलापूर रस्ता
- मंतरवाडी फाटा ते सासवड
- खडीमशीन चौक ते बोपदेव घाट (वाहतूक बंद पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत )
Ashadhi Wari 2025 : विठ्ठलनामाचा गजर अन् सायकलवारीला लातुरातून भक्तांची भव्य सुरुवात!