Video : भर पावसातच पेटलं पुणं! खराडी IT Park मध्ये झालेली फ्री-स्टाईल हाणामारी कॅमेऱ्यात कैद
esakal June 22, 2025 07:45 AM

Pune Kharadi Crime : पुण्यातील खराडी आयटीपार्क परिसरातील एका चौकात भर पावसात काही लोकांमध्ये हाणामारी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. चौकातच वाहन थांबवून एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार इथून जाणाऱ्या एका कारचालकानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. पण आयटीपार्कसारख्या भागात असा गुंडगिरीचा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Kolhapur: पंचगंगेचं पाणी वाढलंच नाही! तरीही जिल्हा प्रशासनानं दिली खोटी माहिती; जिल्हाधिकाऱ्यांनी थेट... व्हिडिओत काय?

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खराडीतील वर्ल्ड ट्रेड सेंटर अर्थात WTC चौकात हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. या चौकातच भर पावसात एक व्यक्ती कारमधून उतरतो आणि बाईकवरील एका तरुणाला मारहाण करायला सुरुवात करतो. या तरुणाला रोखण्यासाठी त्याच्यासोबत असलेली एक महिला मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करते. त्यातच दुसऱ्या एका दुचाकीवरील एक तरुण पाईप सदृश्य वस्तूनं कारमधील व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतो.

पण तेवढ्यात दुसरा एक व्यक्तीला त्याला पकडून ठेवतो. भर पावसात अचानक हा प्रकार घडल्यानं चौकातून जाणारे इतर लोकही गोंधळून जातात की यांचं नेमकं काय सुरु आहे. पण यामध्ये शेवटी नेमकं काय घडलंय? हे कळू शकलेलं नाही.

View this post on Instagram

A post shared by Aditya (@me_adimanav)

Samvidhan Samata Dindi: "...अन् संविधान समता दिंडी बंद पडावी"; पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार असं का म्हणाले?

दरम्यान, वाहनाला धडक लागल्याच्या किंवा काहीतरी शाब्दिक वाद झाल्यानं हा वाद पेटल्याचं दिसून येत आहे. पण नशिब या मारहाणीत कोणी गंभीर जखमी झालेलं नाही. पण आयटीपार्कसारख्या परिसरात अशा प्रकारची मारहाण झाल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. तसंही पुणे शहर हे आता गुंडांचं शहर बनलंय का? असं म्हणावं इतक्या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना सातत्यानं घडत आहेत. यावर पोलिसांचा आजिबात वचक राहिलेला दिसत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.